

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शांतता रॅली काढत सांगता नाशिकमध्ये केली. या रॅलीसाठी पाच लाख लोक येतील, असे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात आठ हजारच आले. त्यामुळे त्यांच्याकडे आता फारसे कोणी लक्ष देत नसल्याचे सांगत गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या शिव्या ऐकतोय, अशी टीका ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर केली.
मंत्री भुजबळ म्हणाले, जरांगे यांना विधानसभेला 288 जागा लढवून मुख्यमंत्री व्हावे, असा उपरोधक टोलाही लगावला. राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असून, उपोषणकर्ते जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता नाशिक येथे झाली आहे. यावेळी जरांगे यांनी नाशिककरांचे आभार मानत, चक्क कॉलर टाइट केल्याचं म्हटले होते. यावर बोलताना भुजबळ यांनी जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही. नाशिकच्या सांगता रॅलीला 5 लाख लोक येणार असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात आठच हजार लोक सहभागी झाल्याचे म्हटले. तसेच अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्यांबाबत जुन्नरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे योग्य नाही. महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याचा सल्ला भुजबळांनी येवल्यातील दौऱ्यात दिला आहे. तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. प्रबोधन करताना दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला. तसेच सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे यांनी आता विधानसभेला 288 जागा लढवून मुख्यमंत्री व्हावे, त्यांना त्यात त्यांची ताकद कळेल, असा उपरोधिक टोला यावेळी भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला.