Soldier Ends Life | सुट्टीवर आलेल्या जवानाची गळफास घेत आत्महत्या

Soldier Ends Life | भारतीय सैन्यात असलेला युवा सैनिक सागर रंगनाथ कुंदे (२७) याने सुट्टीवर आलेला असताना राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास खडकजांब येथे घडली.
Ended life
Ended lifePudhari Photo
Published on
Updated on

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

भारतीय सैन्यात असलेला युवा सैनिक सागर रंगनाथ कुंदे (२७) याने सुट्टीवर आलेला असताना राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास खडकजांब येथे घडली.

Ended life
Nashik Gudi Padwa 2026 | साखरेच्या गाठींना महागाईची झळ! ५० रुपयांचा 'हार' आता १०० पार; नाशिककरांच्या खिशाला कात्री

त्याच्यावर सोमवारी (दि.१६) शासकीय इतमात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खडकजांब येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला सागर यास लहानपणापासूनच देशसेवेचे वेड होते.

त्यानुसार त्याने शिक्षण घेत भारतीय सैन्येत भरती झाला होता. १ मार्च रोजी सागर हा घरी सुट्टीवर आलेला होता. त्याने रविवारी (दि. १५) घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने बेशुद्ध झाला.

Ended life
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाचं 2 हजार कोटींचं बजेट सज्ज! खेड्यांच्या विकासासाठी तिजोरीचा दरवाजा होणार खुला

त्यास तत्काळ वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती सोमनाथ गोविंद कुंदे (४५) यांनी वडनेर भैरव पोलिसांत दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news