CETP : सिंहस्थापूर्वी ‘सीईटीपी’ होणार कार्यान्वित

निविदा प्रक्रिया पूर्ण : 12 कोटींच्या निधीतून उभारणार प्रकल्प
Nashik News
CETP : सिंहस्थापूर्वी ‘सीईटीपी’ होणार कार्यान्वितFile Photo
Published on
Updated on

'CETP' to be operational before Simhastha

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या 150 पेक्षा अधिक प्लेटिंग आणि कोटिंग उद्योगांमधून बाहेर पडणार्‍या सांडपाण्याचा प्रश्न अखेर निकाली निघणार आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्याअगोदर म्हणजेच ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे ध्येय असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Nashik News
Water Storage Nashik Dam | धरणसमूहात आठवडाभरात 13 टक्के वाढ

गेल्या कित्येक वर्षांपासून सीईटीपी प्रकल्प उभारण्यासाठी निमा, आयमा या औद्योगिक संघटनांकडून पाठपुरावा केला जात आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी लागणार्‍या निधीत एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उद्योजकांचे किती योगदान असावे, यावरून मतभेद होते. प्रारंभी या प्रकल्पासाठी 16 कोटींचा निधी निश्चित करण्यात आला होता.

त्यात केंद्र शासन 50 टक्के, प्रदूषण नियंत्रण मंडळ 25 टक्के, एमआयडीसी 20 टक्के आणि मेटल फिनिशर्स असोसिएशनचे सदस्यांकडून पाच टक्के असे सूत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यावर अखेरपर्यंत एकमत होऊ शकले नाही. दरम्यान, आता हा प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल पडले असून, प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रियादेखील पूर्णत्वास आल्याची माहिती समोर येत आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 23 जूनपर्यंत होती. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 24 जून रोजी निविदा उघडण्यात आल्या.

Nashik News
Nashik Crime News : अबब... तीन वर्षांत ७१० किलो अमली पदार्थ जप्त

12 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात 50 टक्के योगदान एमआयडीसीचे असणार आहे. 20 टक्के मेटल फिनिशर्स असोसिएशनचे सदस्यांचे तर पाच टक्के योगदान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असणार आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारीमध्ये उद्योगांशी संवाद साधताना एमपीसीबीचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी अंबड एमआयडीसीमधील प्रस्तावित सीईटीपी प्रकल्पाच्या बांधकामात होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी चौकशीचे आणि प्रकल्पाला चालना देण्याचे आश्वासनही दिले होते.निविदा प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली असून, पुढील काही दिवसांत निवडलेल्या कंत्राटदारास प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण आणि कार्यान्वित होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.

निविदा प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली असून, पुढील काही दिवसांत निवडलेल्या कंत्राटदारास प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण आणि कार्यान्वित होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.
- जयवंत पवार, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news