

नाशिक : संततधारमुळे जिल्ह्यांतील धरणसमूहातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील धरणसमूहांत 13 टक्क्यांनी वाढ होऊन धरणसाठा 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील 3 महिन्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारमुळे धरण समूहांच्या पाणीसाठ्यात दिवसागणिक वाढ होत असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या संततधार सुरू असल्याने धरणसमूहात 13 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. परिणामी, गंगापूर, दारणा, कादवा धरणांसह नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 61 टक्के भरले आहे.
दारणा - 4,079
गंगापूर- 3,944
कादवा- 795
होळकर ब्रिज- 4,881
नांदूरमध्यमेश्वर - 9,465
धरण समूह - पाणी साठा
गंगापूर धरण समूह- 50.65 टक्के
पालखेड- 27.40 टक्के
ओझरखेड- 24.38 टक्के
दारणा - 51.33 टक्के
भोजापूर- 67.4 टक्के
गिरणा खोरे - 27.77 टक्के
पुनद - 39.38
मागील आठवड्यात भोजापूूर धरण कोरडेठाक झाले होते. मात्र, आठवडाभर झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होऊन या धरणाचा पाणीसाठा थेट 67 टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर, कादवा, भावली, भोजापूर धरणांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 61.87 टक्के, कादवा 64.32 टक्के, भावली 62.06 टक्के, तर भोजापूर धरण समूहात 67.04 टक्के पाणीसाठा झाला आहे.