बर्थडे साजरा करताय ? मग हे वाचाच... आता सरकारी कार्यालयात केक कापणे पडणार महाग!

Govt Office News : आता थेट शिस्तभंगाची कारवाई होणार; शासनाकडून परिपत्रक प्रसिद्ध
Govt Office News
Govt Office News Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात पडणार आहे. राज्य शासनाने अशा प्रकारांवर कडक भूमिका घेत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या अनुषंगाने परिपत्रक काढले आहे. कार्यालयीन वेळेत किंवा कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे हा शिस्तभंग मानला जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.

परिपत्रकानुसार नियमांचे उल्लघंन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशासकीय चौकशी होऊ शकते. त्यानंतर समज देणे, लेखी तडकाफडकी तक्रार, पदोन्नती थांबवणे, निलंबन किंवा सेवासमाप्ती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शासनाने संबंधित विभागप्रमुखांना याबाबत कठोर सूचना दिल्या आहेत.

Govt Office News
Govt Office News : नक्की सुरु आहे तरी काय? शासकीय वेळेतही कर्मचारी कार्यालयात सापडेना; नागरिक हवालदिल

कार्यालयीन वेळेत 'सेलिब्रेशन'चा बेत आखला जातो. यात केक, समोसे, फोटो, इन्स्टाग्राम रील्स हे सगळे कार्यालयीन वेळेत चालू असते. काही ठिकाणी तर कामकाज बंद ठेवून केककटिंग सोहळे रंगतात, कामाच्या वेळेतच मोठ्या उत्साहात केक कापला जातो. नाश्त्यांचे देखील आयोजन केले जाते. त्याकरिता कर्मचारी तासभर कामे बाजूला ठेवून यात सहभागी होतात. काही ठिकाणी संगीत आणि मोबाइल व्हिडिओ शूटिंग केले जाते. यात अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिपाईदेखील सहभागी होतात. सार्वजनिक धन, वेळ आणि संसाधनांचा हा सरळ अपव्यय आहे. दैनिक भेटींसाठी आलेल्या नागरिकांच्या कामांना संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन खोळंबा ठरत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेली कार्यालयीन वेळ ही लोकसेवेसाठी आहे, वैयक्तिक सोहळ्यांसाठी नाही, याचे भान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवण्याची गरज आहे.

असा आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नियम

कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचा गौरव, निरोप वा सन्मान समारंभासाठी शासनाची पूर्वमान्यता अनिवार्य. कार्यालयीन वेळेत खासगी ठिकाणी आणि अनौपचारिक निरोप समारंभांना मुभा परंतु त्यासाठीही कोणत्याही कर्मचाऱ्यांवर वर्गणीसाठी दडपण टाकण्यास मनाई. या सर्व नियमांचे उल्लंघन झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. या नियमानुसार, कोणताही शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत किंवा परिसरात वैयक्तिक समारंभ अजिबात साजरे करू शकत नाही. अशी कृती ही शिस्तभंग समजली जाते आणि ती गंभीर स्वरूपाची मानली जाते. यामुळे संबंधितावर कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news