Srinivas Nayak Firing Case | हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

Srinivas Nayak Firing Case | श्रीनिवास नायक गोळीबार प्रकरण
श्रीनिवास नायक
श्रीनिवास नायक
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
परवरी येथील कॅसिनो मॅजेस्टिक ग्रुपचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराने राज्यात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात हल्लेखोर पसार झाले. गोळीबारात नेम चुकल्याने नायक बचावले. हल्लेखोरांचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात दोघेही संशयित रात्री सुमारे ७.५१ वाजता मॅजेस्टिकच्या परिसरात प्रवेश करताना दिसून आले.

श्रीनिवास नायक
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

प्रत्यक्ष गोळीबार रात्री सुमारे ९.३० वाजता झाला. त्यामुळे या सुमारे दीड तासांच्या कालावधीत हल्लेखोरांनी नेमकी कोणती हालचाल केली, कोणाची वाट पाहिली आणि हल्ल्याचे नियोजन कसे केले, याचा तपास पोलिस करीत आहेत. दोन्ही संशयितांची छायाचित्रे सीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती आली आहे.
हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. नायक यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याने पोलिसांकडून व्यावसायिक वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा तपास सुरू आहे.

फॉरेन्सिक पथकानेही शुक्रवारी रात्री मॅजेस्टिक पॅराडाईज परिसराची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावरून गोळीबारातील रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. गोळीबारात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा प्रकार, काडतुसांचे स्वरूप आणि इतर भौतिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास पुढे नेत आहेत.

जीए नोंदणीची बेवारस कार तपासाच्या कक्षेत

तपासादरम्यान पोलिसांना गोवा (जीए) नोंदणीची एक बेवारस कार आढळून आली आहे. या कारचा गोळीबाराच्या घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. हल्लेखोरांनी या वाहनाचा वापर केला होता का, तसेच वाहन त्यांच्या हालचालींशी संबंधित आहे का, याची माहिती पोलिस घेत आहेत. कारच्या मालकाची माहिती मिळविण्यासह तिची तांत्रिक तपासणीही केली जात असून, या वाहनामुळे तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय प्रतिक्रिया

  • चोडणकरांचा सरकारवर हल्लाबोल:परवरी पोलिस स्थानकाजवळ गोळीबाराची घटना घडल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलिस स्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडलेली ही घटना गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अधःपतनाचे भयावह चित्र असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

  • कायदा सुव्यवस्था ढासळली : युरी आलेमाव:राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकार आणि पोलिस यंत्रणेवर टीका करून कॅसिनो संचालकावर झालेला हल्ला हा मुख्यमंत्री आणि पोलिस यंत्रणेच्या अपयशाचे द्योतक असल्याचा आरोप केला. राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असून, पोलिस यंत्रणेतील त्रुटी दूर करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.

श्रीनिवास नायक
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"
  • हल्ल्यामागे सुडाच्या हेतूची शक्यता : बोरकर:आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मॅजेस्टिक पॅराडाईजच्या परिसराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बोरकर म्हणाले, या हल्ल्यामागे सुडाचा हेतू असू शकतो. हा गोळीबार पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. परवरीसारख्या मुख्य परिसरात अशी घटना कशी घडू शकते, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. ही घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक असल्याचा दावा त्यांनी केला.

  • 'गन कल्चर'ला मुख्यमंत्री जबाबदार : नाईक:परवरी येथे कॅसिनो संचालकावर झालेला गोळीबार गंभीर घटना असून, सरकार गोव्याला गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनवत आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे (आप) गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली. पणजी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा उपाध्यक्ष मॅन्युअल कादोज व नगरसेवक जॅक सुखिजा उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news