

Deola Burning Car
देवळा : देवळा-नाशिक राज्य मार्गावर रामेश्वर फाट्या नजीक गुरुवारी (दि. 24) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका कारला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे. या आगीत कार पूर्ण जळून खाक झाली. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली असून, देवळा पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , तुषार पगारे (रा. नाशिक) हे देवळा तहसील कार्यालयात व्याख्यान देण्यासाठी येत असताना सकाळी साडे दहाच्या सुमारास देवळा-नाशिक राज्य मार्गावर रामेश्वर फाट्या नजीक त्यांच्या कारलाआग लागल. यावेळी तुषार पगारे यांनी तात्काळ गाडी उभी करून ते बाहेर उतरले त्यानंतर काही क्षणात कार ने पेट घेतली. आग विझविण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांची प्रयत्न केला. मात्र कार संपूर्ण जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हूणन कार मालक पगारे यातून बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या आदेशानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.