Nashik Teacher's Constituency |कोटा गाठू न शकल्याने झाला पराभव

नाशिक शिक्षक मतदारसंघात कोटा न गाठल्याने उमेदवाराचा पराभव
Nashik Teacher's Constituency Election 2024
Nashik Teacher's Constituency Election 2024file photo
Published on
Updated on

नाशिक : ऑनलाइन डेस्क

नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण ६४ हजार ८५३ मतदान झाले. यातील ६३ हजार १५१ मते वैध तर, १७०२ मते अवैध ठरली. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तर पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने सोमवार (दि.१ जुलै) रात्री उशिरा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली होती.

विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याने दराडे यांनी तो पूर्ण केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या पसंतीक्रमाच्या मोजणीत शिंदे गटाच्या किशोर दराडे यांना २६२४७ मते मिळाली. भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे १७३७२ मते मिळवून द्वितीयस्थानी राहिले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. गुळवे यांना १६२८० मते मिळाली. या फेरीत उमेदवाराला कोटा गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मोजणी सुरू करण्यात आली होती. दराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे मंगळवार (दि.२ जुलै) सकाळपर्यंत मतमोजणी सुरू राहीली. अखेर किशोर दराडे यांनी मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे ते विजयी झाल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण गेडाम यांच्याकडून सांगण्यात आले.

Nashik Teacher's Constituency
Nashik Teacher's Constituencypudhari news network

रात्रभर सुरु होती मतमोजणी...

मतमोजणीत तीन केंद्रांवर पाच मतपत्रिका अधिक आढळल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. चौकशीअंती संबंधित मतपत्रिकांवर अनुक्रमांकाची छपाई झाली नसल्याचे उघड झाले. मतपत्रिकेमागे अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का होता. त्यामुळे या मतपत्रिकाही वैध ठरून शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप निकाली निघाला. यामुळे मतमोजणीला उशीर झाला होता.

कोटा पद्धतीने मतमोजणी..

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाच्या सुत्रानुसार एकूण मतपत्रकेतील अवैध मतपत्रिका बाद करण्यात आल्यानंतर उर्वरीत मतपत्रिकेची छाननी करण्याकरीता त्यास दोनाने विभागून अधिक एक करत आल्यानंतर कोटा निश्चित करण्यात आला. त्यानुसार निवडणुकीत विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

म्हणून कोटा निश्चित करण्यात आला...

मोजणी प्रक्रियेत सर्वप्रथम सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात आली. त्यानंतर विजयाचा कोटा निश्चित करण्यासाठी वैध आणि अवैध मतपत्रिका बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने विजयाचा कोटा निश्चित करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.१ जुलै) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अनेक अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news