California Grapes | नाशिक, सांगली, सोलापुरात होतेय लागवड; आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी

California Grapes | द्राक्षाचे कॅलिफोर्निया आरा ३५, ३६ वाण शेतकऱ्यांसाठी वरदान
Grape Export News
Grape Export NewsPudhari News Network
Published on
Updated on

सोलापूर : सुमीत वाघमोडे
द्राक्षाचे कॅलिफोर्निया आरा ३६ व ३५ वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. हे वाण जास्त टिकणारे, रोगप्रतिकारक आणि चांगला भाव मिळवून देणारे आहे. नाशिक, सांगली, सोलापूर व कर्नाटकातील टिकोटी येथे या वाणाची लागवड सुरू झाली आहे. मुसळधार पावसातही टिकून राहण्याची क्षमता, आकर्षक रंग, कडकपणा यात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या द्राक्षांना चांगली मागणी असून व दर चांगला मिळत आहे.

Grape Export News
Nashik Pothole Issue | नाशिक खड्डेप्रकरणी मनपा आयुक्तांचा मोठा दणका; शहर अभियंत्यांसह 36 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

विलासवराव शिंदे यांनी प्रथम नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग केल्यानंतर सांगली, कर्नाटक सोलापुरात लागवड सुरू झाली. हे वाण नैसर्गिकरीत्या आकाराने मोठे आहे. फळ वाढीसाठी रसायनांची गरज नाही. ही द्राक्षे पावसात न तडकता हवामान बदलांशी जुळवून घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या द्राक्षांना मोठी मागणी आहे.

तासगावतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत युनिफ्रुट फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. त्यातील पहिल्या टप्प्यात ५३७ शेतकऱ्यांनी २०२४ मध्ये आरा ३५ व ३६ वाणाची १२५० एकरावर लागवड केली. यातील ६५ एकरावर एकरी सरासरी सहा टनांपेक्षा अधिक उत्पादन मिळाले. हे सर्व एक्स्पोर्ट क्वॉलिटीची द्राक्षे होती. त्यांना सरासरी १७० रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यांना एकरी आठ लाखांपर्यंतचा खर्च आला. तरीही पहिल्या वर्षी त्यांना फायदा झाल्याची माहिती युनिफ्रुटचे संचालक सुजित एकुंडे यांनी दिली. आता दुसऱ्या टप्प्यात त्यांच्याकडे अजून २३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

"आरा ३५ व ३६ हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. एक्स्पोर्ट क्वॉलिटीची ही द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत विकली तरी १०० रुपयांच्या खाली दर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे."

— सुरेश एकुंडे, प्रगतशील शेतकरी, तासगाव

शेतकऱ्यांना गट करून करावी लागते लागवड

ही वाणे पेटेंटेड असल्यामुळे ती इतर कोणत्याही नर्सरीतून किंवा अनधिकृतपणे खरेदी करू शकत नाही. भारतात या वाणांचे अधिकृत हक्क नाशिकच्या सह्याद्री फार्म्सकडे आहेत. यासाठी शेतकऱ्यांचा गट तयार करावा लागतो. किमान एक हजार एकरावर हे वाण लावण्यात येते. त्यासाठी सह्याद्री फार्म्ससोबत कायदेशीर करार करावा लागतो.

या करारानुसार, उत्पादित झालेली सर्व द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी किंवा स्थानिक प्रीमियम बाजारात विकण्यासाठी कंपनी विकत घेण्याची हमी देते. या वाणाच्या लागवडीसाठी प्रति झाड किंवा प्रति एकर ठराविक रॉयल्टी द्यावी लागते. करार झाल्यानंतर कंपनीचे कृषी अधिकारी जमिनीची तपासणी, लागवडीचे अंतर आणि रूटस्टॉक निवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करतात.

Grape Export News
Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

विशेष तपशील...

  • हे वाण थेट स्वतःच्या मुळांवर न लावता डॉग रिज किंवा इतर मजबूत रूटस्टॉकवर क्राफ्ट (कलम) करून लावली जातात. यामुळे जमिनीतील पाण्याचा ताण आणि क्षारता सहन करण्याची क्षमता वाढते.

  • पानांवर आणि घडांवर सारखा सूर्यप्रकाश पडेल, अशी रचना केली जाते. यामुळे द्राक्षांना सारखा रंग आणि गोडवा येतो.

  • पारंपरिक वाणांच्या तुलनेत ही वाणे हवामान बदलांना अधिक सक्षमपणे तोंड देतात.

  • या वाणाची त्वचा जाड असल्याने ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडल्यास द्राक्षे तडकत नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळते.

  • या द्राक्षांची साठवणूक क्षमता उत्तम असल्यामुळे ती युरोप, आशिया आणि आखाती देशांमध्ये लांबच्या प्रवासातही खराब होत नाहीत. त्यामुळे निर्यातीतून शेतकऱ्यांना थेट जास्त नफा मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news