

नाशिक : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) कडून घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन, इंटरमिडीएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल जाहीर झाले. सीए अंतिम परीक्षेत नाशिक मधून निरव हेमनानी याने ४३१ गुण मिळवून नाशिकमधून प्रथम क्रमांक मिळवला. देशपातळीवर निकालात त्याची रॅंक ४७ अशी आहे. राधिका सराफ ४०१ गुण मिळवत व्दितीय तर तितीक्षा संपथ (३९३ ) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
आयसीएआय तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल रविवारी(दि.६) जाहीर करण्यात आले. त्यात नाशिकचे विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यशावर मोहर उमटवली. निरव हेमनानी याने नाशिक जिल्हातून प्रथम क्रमांकावर नाव कोरले. अरमान रुस्तम गिलानी (३६८) चतुर्थ ठरला. सोनई गुजराथी (३६६) नाशिकमधून पाचवी येण्याचा मान मिळवला.
सीए इंटरमिडीएट परीक्षेत सोहम मिलिंद वाघ (४७३) पहिला, पार्श्व हितेश तातिया (४५९ ) दुसरा, राहुल राजेंद्र जैस्वाल (४४८) तिसरा, तीर्था कौस्तुभ भाटमुळे (४३३ ) चौथी आणि केयूर कल्पेश बेदमुथा (४३१) पाचवा येत यश संपादन केले आहे. फाउंडेशनमध्ये शहरात साक्षी चांडक (३५४गुण) पहिली, रूजल राहुल करवा (३४४), आणि सृष्टी प्रमोद चिंचोले (३४२ ) मिळत यशस्वी झाले आहेत.
निकालाबाबत आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष जितेंद्र फाफट म्हणाले की, हा निकाल प्रेरणादायी आहे. मेहनत आणि चिकाटीची जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले. यापुढेही विद्यार्थ्यांनी सीए करिअर निवडून या क्षेत्रात यशस्वी होण्याचा विचार करावा.
आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष अभिजीत मोदी, खजिनदार विशाल वाणी, सरचिटणीस मनोज तांबे, सदस्य रोहन कुलकर्णी, दिलीप बोरसे, शुभम मुंदडा आणि वेस्टन इंडिया रिजनल कौन्सिल उपाध्यक्ष पियुष चांडक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.