

कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे 2025 मध्ये झालेल्या परीक्षेत कोल्हापूरमधील 44 विद्यार्थी सीए झाले. कोल्हापूर विभागातून राजस्व हिरवे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सन्मय कदम यांनी दुसरा, तर अर्चना कुलकर्णी यांनी तिसरा क्रमांक मिळवला. आषाढी एकादशीच्या दिवशीच निकाल जाहीर झाल्याने ‘सीए झालो भारी, कोल्हापुरात आनंदाची घडली वारी’ अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात प्रिया अग्रवाल, आर्या कुलकर्णी, अमृता जाधव, साक्षी पाटील, सय्यम गुंदेशा, आदित्य दातार, ऋता पारगावकर, कल्पेश पाटील, विजय हिंदुजा, श्रद्धा पानवलकर, मयूर वाळवेकर, विवेक विभूते, प्राजक्ता थोरूसे, प्राजक्ता होसुरे, चिरंजीवी तेलसंग, मोहिनी परीट, रितिका पटेल, ऋतुजा तळवार, राहुल महाजन, मधुरा पाटील, गायत्री शिवणकर, खूशी भट्ट, आदित्य कुलकर्णी, शारदा मिरजकर, आशिष ठकार, श्वेता संकपाळ, श्रुती पटेल, ऐश्वर्या पितालिया, जयश्री कुराडे, वैभव पाटील, वृषभ पाटील, सौरभ यादव, अमृता पाटील, पूजा भानुशाली, प्राजक्ता देवेकर, रोहित कोळी, अक्षय पाटील, जुगल गायकवाड, सेबेस्टिना बारदेस्कर, मुस्कान तुलसानी व दुर्गा वाली हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए नितीन हरगुडे यांनी दिली.