Narhari Zirwal | 'बायोफार्मा शक्ती' उपक्रम औषध क्षेत्रातील प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल : नरहरी झिरवाळ

Union Budget 2026 | ​'बायोफार्मा शक्ती' उपक्रमासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटींची तरतूद
Biopharma Shakti Initiative Budget 2026
Narhari ZirwalPudhari
Published on
Updated on

Biopharma Shakti Initiative Budget 2026

मुंबई :​ महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे फार्मास्युटिकल आणि लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना केंद्र सरकारने पाठबळ दिले आहे. 'बायोफार्मा शक्ती' उपक्रम औषध क्षेत्रातील प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला.

देशातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये 'बायोफार्मा शक्ती' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षांकरिता १०,००० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, यामुळे औषध निर्मिती क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.

Biopharma Shakti Initiative Budget 2026
Union Budget 2026 | महिलांसाठी 'लखपति दीदी'नंतर आता 'सी-मार्ट' योजनेची घोषणा; व्यवसायासाठी मिळणार स्वस्त कर्ज

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे 'लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर'साठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्राने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

बायोफार्मा क्षेत्रातील जागतिक दर्जाचे 'इनोव्हेशन पार्क' निर्माण करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या उपक्रमामुळे देशांतर्गत उत्पादन, निर्यात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

Biopharma Shakti Initiative Budget 2026
Union Budget 2026 |कोकणातील अर्थव्यवस्थेला बळ देणारा अर्थसंकल्प: आ. ॲड. निरंजन डावखरे

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news