

नाशिक | नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये इनोव्हाच्या धडकेत एक पादचारी ठार झाला असून रिक्षातील 6 जण जखमी झाले आहेत. ठार झालेली पादचारी व्यक्ती गुजरात राज्यातील गांधीनगर येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील प्रवासी Mh15 ja3022 क्रमांकाच्या रिक्षाने त्र्यंबकेश्वर हुन नाशिकला येत होते. त्याचवेळी इनोव्हा कार त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होती. वाहनात सीएनजी भरत असताना रोहितभाई किशोरभाई चौधरी (रा. गांधीनगर गुजरात) हे पेट्रोल पंपाबाहेर आले असताना रोहितला इनोव्हा कारने धडक दिली. या धडकेत रोहित ठार झाला. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.