

bogus disability certificate; Three employees suspended
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रमाणपत्राच्या परिषदेत आधारे दिव्यांग नोकरी मिळवतांना किंवा बदली करताना सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झालेल्या तीन कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी निलंबन करत त्यांना दणका दिला. यात दोन ग्रामपंचायत अधिकारी व एका शिक्षकाचा समावेश आहे. पवार यांच्या या कारवाईने फेरपडताळणीसाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवताना किंवा बदली करताना सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यानुसार, विविध विभागांतर्गत असलेल्या ६१४ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व ओळखपत्र मागवले होता.
मात्र, वारंवार आदेश देऊनही ग्रामपंचायत विभागातील दोन व शिक्षण विभागातील एका शिक्षकास दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करत युडीआयडी दाखल केला नाही. त्यामुळे पवार यांनी बुधवारी (दि. ३) उशिराने या तिघांवर निलंबनाची कारवाई केली. कोठुरे (ता. निफाड) शाळेत कार्यरत शिक्षक प्रदीपकुमार बागुल यांच्याकडे युडीआयडी मागितला होता. परंतु, त्यांनी वेळेत सादर केला.
गटविकास अहवाल अन् उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केली असता बागूल यांनी दिव्यांग असल्याचा आर्थिक लाभ घेत कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाले. जळगाव (ता. मालेगाव) येथील ग्रामपंचायत अधिकारी सुरितराम भागा शिरोळे आणि कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत बाबुराव पवार यांनी युडीआयडी वेळेत दाखल केला नाही. दिव्यांग कल्याण विभागाकडून प्राप्त पत्रानुसार दिव्यांग प्रमाणपत्र ४० टक्यांपेक्षा कमी असूनही सवलींचा लाभ घेत तरतुदींचा भंग केला. यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी प्रमाणपत्राची फेरपडताळणी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे.