

नाशिक : बिऱ्हाड आंदोलनात सहभागी असणाऱ्या पेठ तालुक्यातील बोरवड आश्रमशाळेतील चतुर्थ श्रेणी रोजंदारी कर्मचारी गौरव विक्रम अहिरे (२१) याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये बाह्यस्रोत भरती करण्याच्या निर्णयाचा पहीला बळी गेल्याचे बोलले जात आहे
आंदोलक गौरव अहिरे याने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून १६ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. उपचारासाठी त्याला मविप्रच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बिऱ्हाड आंदोलक आक्रमक झाले असून आदिवासी विभागाच्या निर्णयामुळे अहिरेचा बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अहिरेच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती नाजूक असून दिवाळीत त्याचे लग्नही ठरले होते. त्यात रोजंदारी तत्वावरील नोकरी गेल्यामुळे कुटूंब निराश झाले होते. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा आंदोलकांनी केला.
गौरवच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक होती. त्यातच यंदा दिवाळीत त्यांचे लग्न ठरले होते. त्यात रोजंदारी तत्वावरील नोकरी गेल्याने कुटुंब निराश झाले होते. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. बिऱ्हाड आंदोलकांच्या मुंबईतल्या शिष्टमंडळात जाऊन त्यांनी आंदोलकांच्या व्यथा मांडल्या होत्या. परंतु, विभाग आणि शासन व्यथा ऐकून घेत नसल्याने अखेर गौरवने मृत्यूलाच जवळ केले.