Birhad Andolan : बिऱ्हाड आंदोलक आयुक्तालयात; प्रशासनाला आज सायंकाळी 5 पर्यंतचा दिला अल्टिमेटम

आंदोलनकर्त्यांचा संयम अखेर सुटला; पोलिसांचा नाईलाज
आदिवासी विकास भवन, नाशिक
नाशिक : महिनाभरापासून सुरू असलेल्या बिर्‍हाड आंदोलकांच्या संयमाचा बांध मंगळवारी पुन्हा एकदा फुटला अन् त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना प्रथम हात जोडत न्याय देण्याची मागणी केली नंतर, बॅरिकेड्स ढकलून देत आदिवासी आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेली रेटारेटी. कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले गेल्याने त्यापुढेच ठिय्या देत आंदोलकांनी ‘एजन्सीमार्फत नव्हे तर शासनाने रोजंदारीवर नियुक्तीपत्र द्यावे’, अशी जोरदार मागणी केली. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • बुधवार (दि.13) रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा 36 वा दिवस

  • रोजंदारी कर्मचार्‍यांचा संयम अखेर सुटला

  • पदावर काम करीत असतांना अचानक काढून टाकण्यात आल्याने केलं आंदोलन

36th day of the Birhad agitation

नाशिक : बाह्यस्त्रोत रद्द करा या मागणीसाठी गत 35 दिवसांपासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलनास बसलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा संयम अखेर सुटल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलीसांना न जुमानता गेटवरुन उड्या मारत आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसांचा नाईलाज झाला. आंदोलनकर्त्यांनी आज सायंकाळी 5 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.

आदिवासी विकास भवन, नाशिक
Birhad Andolan : बिऱ्हाड आंदोलकांचा आयुक्त कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न
आदिवासी विकास भवन, नाशिक
नाशिक : आदिवासी आयुक्तालयासमोर झालेल्या रेटारेटीत दमछाक झालेल्या महिलेला पाणी पाजताना आरोग्य कर्मचारी.

आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये रोजंदारी वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी गत 3 ते 5 वर्षांपासून शिक्षक आणि कामाठी या पदावर काम करीत असतांना त्यांना अचानक काढून टाकण्यात आले आहे. प्रशासनाकडून खासगी कंपनीकडून भरती करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या पदावर संधी देण्यात आली आहे. याला आंदोलनकर्त्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा विरोध आहे. बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचारी 9 जूनपासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन करीत आहे. 35 दिवसानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर मंगळवारी (दि.13) सायंकाळी 4 च्या दरम्यान आंदोलकांनी गेटसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन सुरु केले.

आदिवासी विकास भवन, नाशिक
Birhad Agitation in Nashik : मंत्री झिरवाळांची शिष्टाई अपयशी; बिऱ्हाड आंदोलकांचा ठिय्या कायम
आदिवासी विकास भवन, नाशिक

नोकरी आमच्या हक्काची ...

लढेंगे, जीतेंगे, होश मे आवो होश मे आवो, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वातावरण तापल्याने पोलीसांनी गेटवर मानवीसाखळी करुन आंदोलनकर्त्यांना अडविले. मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी गेट तोडून पोलीसांचा विरोध पत्करत आत घुसण्याचा प्रयत्न केला.

पोलीसांनी अथक प्रयत्नांद्वारे आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसांचा नाईलाज झाला. पाचवाजेच्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्तालयात प्रवेश करीत आवारात ठाण मांडले. सद्यस्थितीत आंदोलनकर्त्यांनी आवारात ठाण मांडले असून घोषणाबाजी सुरु आहे.

आदिवासी विकास भवन, नाशिक

बुधवारी (दि.13 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

आंदोलनकर्त्यांनी आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम दिला असून 5 वाजेपर्यंत न्याय द्या अन्यथा इमारतीत घूसून आयुक्तांच्या केबीनसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान पोलीस प्रशासन सतर्क असून आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची हरकत करु नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सावध पवित्रा घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news