राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोड

राज ठाकरे यांचे संकेत : महायुतीतील नाराजांवर लक्ष ठेवण्याची सूचना
Raj Thackeray
राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोडFile Photot
Published on
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी सांगेन तेव्हा मुंबईला या. महाविकास आघाडी, महायुतीतील नाराजांवर लक्ष ठेवा. राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोड होणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकला पोहोचलेल्या नवनिर्माण यात्रेदरम्यान त्यांनी उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. मात्र | निवडणूक लढविण्याबाबत किंवा रणनीतीबाबत फारशी स्पष्टता दिली नसल्याने बैठकीसाठी आलेल्या इच्छुकांच्या मनात धाकधूक कायम असल्याचे दिसून आले.

दोन दिवसीय नाशिक दौऱ्यादरम्यान राज यांच्या उपस्थितीत रविवारी हॉटेल एसएसके येथे दिवसभर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या दरम्यान राज ठाकरे यांनी पाचही जिल्ह्यांतील ४७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, नेते अविनाश अभ्यंकर आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news