

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | अंजनेरी पर्वतावर 70 ते 80 भाविकांवर मधमाशांचा हल्ला झाला आहे. हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावरील मंदिर दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. अचानक हल्ला झाल्याने भाविकांची धावपळ झाली आहे.
हनुमान जयंती निमित्त पहाटे श्री बालहनुमान यांची विधीवत पुजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी सरपंच जिजाबाई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भाविकांवर किरकोळ मधमाशांचा हल्ला झाला. परंतु, कोणीही जखमी झालेले नाही. त्यानंतर सुरळीतपणे भाविक दर्शन घेत आहेत.
सागर चव्हाण, उपसरपंच, अंजनेरी.