Ashok Kharat Farmhouse Expose- भोंदू खरातचा फार्महाउसवरील काळा खेळ उघड

Ashok Kharat Farmhouse Expose-व्हिडिओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता त्याच्या फार्महाउसवरील कथित काळे कारनामे उघडकीस आले आहेत. खरातच्या फार्महाउसवर काम करणाऱ्या स्वयंपाकी कर्मचाऱ्याने घरातील काही संशयास्पद हालचालींचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने त्याच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांना अधिक बळ मिळत आहे.

Ashok Kharat Case
Goa news | मोरजीतील 'ती' आठ बांधकामे पाडण्याचा एनजीटीचा आदेश

विशेष म्हणजे, या स्वयंपाकी कर्मचाऱ्याला खरातच्या जवळच्या एका व्यक्तीने मुद्दाम त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी फार्महाउसवर कामावर ठेवले होते, हेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर खरातच्या ऑफिसबॉयनेही अनेक महत्त्वाची माहिती उघड करत फार्महाऊसवरील संशयास्पद हालचालींचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले असून, त्यातून आणखी गंभीर आणि धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Kharat Case
Goa - चौकशी झाली; मात्र कारवाईत चालढकल

दरम्यान, पोलिस कोठडीत असताना अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला चौकशीदरम्यान उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता "काही आठवत नाही" अशी भूमिका घेत असल्याने त्याची गजनी ट्रिक चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वीही प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत तपास चुकवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. तपास पुढे सरकत असताना आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवेतून काजू कतली काढून कोट्यवधींची लूट !

नाशिक : अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मानसिक फसवणूक करत कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांचा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला असून, समाजमनाला हादरवणारा हा प्रकार ठरत आहे. २०१७मध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधताना खरातने सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह वर्तन करत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली मोकळा हात दाखवत हवेतून काजू कतली काढल्याचा बनाव केला आणि "हा प्रसाद" असे म्हणत संबंधित सीएला प्रभावित केले.

या हातचलाखीच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे जाळे विणत खरातने त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण केली. आई-वडिलांच्या मृत्यूचा धोका असल्याचे सांगत अवतार पूजा करण्याचा बहाणा करून वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी केली. या दबावाखाली संबंधित सीएकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. भीती, अंधविश्वास आणि फसवणूक यांचा संगम साधत आर्थिक शोषण करण्याची ही योजनाबद्ध पद्धत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली असून, सरकारवाडा पोलिस ठाण्यात अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, पुरावे आणि संबंधितांची साखळी तपासात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news