Bangladeshi infiltrators | बांगलादेशींचा 'डंकी रूट'

Pudhari Special Ground Report | मुंबई, पुण्यानंतर बांगलादेशींचे नाशिकमध्ये बस्तान : छोट्या शहरांकडेही वाढला कल
नाशिक
Pudhari News Network
Published on
Updated on
Summary
  • देशात 'डंकी रूट'ने येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा ओघ देशभरात सुरू

  • विशेषत: नाशिक हे बांगलादेशींसाठी आश्रयाचे नवे ठिकाण

  • नाशिकमध्ये नुकत्याच पकडलेल्या पाच बांगलादेशी महिला या देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले

नाशिक : सतीश डोंगरे

The influx of Bangladeshi infiltrators entering the country through the 'donkey route' is continuing across the country. Bangladeshis are taking shelter in every corner of the country by easily creating illegal documents.

देशात 'डंकी रूट'ने येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा ओघ देशभरात सुरू आहे. सहजपणे अवैध कागदपत्रे तयार करून बांगलादेशी देशाच्या कानाकोपऱ्यात आसरा घेत आहेत. राज्यात पुणे आणि मुंबईत तर बांगलादेशींच्या अक्षरश: वस्त्या वसल्याचे आढळलेले आहे. या शहरांमध्ये कारवाईचा वेग वाढल्यामुळे आणि ही शहरे खर्चिक असल्यामुळे, बांगलादेशींनी आता आपला मोर्चा राज्यातील अन्य शहरांकडे वळविला आहे. अशात घुसखोर बांगलादेशी बांगलादेश ते भारत आणि महाराष्ट्र ते नाशिक व अन्य जिल्हे असा प्रवास कसा करतात, याचीच पोलखोल करणारा हा वृत्तांत...

बांगलादेशींसाठी आश्रयाचे नवे ठिकाण 'नाशिक'

विशेषत: नाशिक हे बांगलादेशींसाठी आश्रयाचे नवे ठिकाण ठरत असल्याचे मागील काही घटनांवरून स्पष्ट होते. या बांगलादेशींची भारतातील वाट सुकर करण्यासाठी एजंटचे रॅकेटच सक्रिय आहे. अर्थात यात काही 'घर के भेदी'ही आहेत. पाच- दहा हजारांसाठी देशातील काही 'भेदी' घुसखोर बांगलादेशींना भारतीय बनावट कागदपत्रे तयार करून देण्यात मदत करीत असल्यामुळे, अनेक घुसखोर बांगलादेशी उजळ माथ्याने भारतात राहात आहेत. त्यातील काही बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे गैरप्रकारही करीत असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस कारवाईत समोर आले आहे. नाशिकमध्ये नुकत्याच पकडलेल्या पाच बांगलादेशी महिला या देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अशी अनेक गैरकृत्ये करताना दररोज देशभरात बांगलादेशी आढळत आहेत.

दोन्ही देशांच्या सीमेवर तारेचे कुंपणच नाही

भारत- बांगलादेश सीमा तब्बल ४,१५६ किलोमीटर लांबीची आहे. सीमेवर पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा ही राज्ये आहेत. याशिवाय दोन देशांमध्ये वाहणाऱ्या ५० हून अधिक छोट्या- माेठ्या नद्या आहेत. पश्चिम बंगालचे मालदा, कुछ बेहार, नॉर्थ २४ परगणास, मर्शिदाबाद, दिनेशपूर, चेपाई, नवाझगंज, नंदिया ही सर्वाधिक लोकसंख्या असलेली गावेे आणि जिल्हे सीमावर्ती भागात आहेत. त्यातील काही गावेे सीमेच्या दोन्ही बाजूंनी आहेेत. त्यामुळे भारत- बांगलादेश सीमेवर 'बॉर्डर फेंसिंग' अर्थात तारेेचे कुंपण उभारण्याचा पेच आहे. हे कुंपण उभारण्यासाठी भारताकडून वेळोवेळी जमीन अधिग्रहण प्रस्ताव सादर केला गेला. मात्र, दरवेळी बांंगलादेशने १९७५ चा 'भारत- बांगलादेश बॉर्डर गाइडलाइन'चा दाखला देत त्यावर हरकती घेऊन अडथळा आणला. त्यामुळे दोन्ही देेशांना सीमेच्या १५० यार्डच्या भागात कोणत्याही प्रकारचे 'डिफेन्स कन्स्ट्रक्शन' अद्यापपर्यंत करता आलेले नाही. याशिवाय सीमेवर सीसीटीव्ही किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बसविण्यावरही नेहमीच बांगलादेशाच्या बॉर्डर गार्डने विरोध केला. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांनंतरही बांगलादेशाची सीमा काही अंशी घुसघोरीसाठी सोयीची झालेली आहे.

नाशिक
CNG Queue Problem: सीएनजी हवा, मग रांग लावा
नाशिक
बांगलादेशी सीमा पार करून भारतात घुसखोरी करतातPudhari News Network

नद्या, जंगल अन् टनेलमार्गे घुसखोरी

बांगलादेश सीमेवर असलेल्या भारताच्या पाचही राज्यांमधून, बांगलादेशात नद्या प्रवाहित होत आहेेत. नेमका हाच मार्ग घुसखोरांसाठी सोयीचा ठरत आहे. विशेषत: हिवाळा हा ऋतू घुसखोरीसाठी निवडला जातो. हिवाळ्यात नद्यांची पाणी पातळी कमी झालेली असते. याशिवाय नद्यांच्या भागात धाट धुकेे असल्याने, त्यातून बांगलादेशी सीमा पार करून भारतात घुसखोरी करतात. अर्थात हा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. त्यासाठी घुसखाेरांना जिवाची बाजी लावावी लागते. नद्यांमध्ये मगरी तसेच दलदलीचा भाग असल्याने त्यातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक असते. मात्र, अशातही बांंगलादेशी जिवाची बाजी लावून भारतात येतात अर्थात यासाठी एजंट त्यांंना मदत करीत असून, अवघ्या आठ हजारांत नद्या पार करून देतात.

नाशिक
एखाद्याने एजंटला पैसे जास्त देण्याची तयारी दाखविल्यास, घनदाट जंगल किंवा अंडरग्राउंड टनेल्समधून घुसखोरांना सीमा पार करून भारतात पाठविले जाते.Pudhari News Network

एखाद्याने एजंटला पैसे जास्त देण्याची तयारी दाखविल्यास, घनदाट जंगल किंवा अंडरग्राउंड टनेल्समधून घुसखोरांना सीमा पार करून भारतात पाठविले जाते. भारत आणि बांगलादेश सीमेवरील 'सुंदरबन' नावाचे घनदाट जंगल आहेे. हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असून, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. या जंगलातून एजंट घुसखोरांंना सीमा पार करून देतात. जंगलातील दोन दिवसांच्या प्रवासानंतर बांगलादेशी मेघालयात दाखल होऊ शकतात. त्याचबरोबर भारत- बांगलादेश सीमेवर जागोजागी टनेल्स अर्थात भुयारी मार्ग केले जातात. हे भुयारी मार्ग पोलिस आणि सैैनिक कारवाईत नेहमीच बेकायदेशीर असलेले आढळून येतात. जंगल तसेच भुयारीमार्गे घुसखोरीसाठी एजंटकडून १८ ते २० हजार आकारले जातात. याशिवाय भारतात दाखल झाल्यानंतर एजंटकडून देशाच्या विविध भागांत पोहाेचविण्याची जबाबदारी घेकारली जातेे. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यात बांगलादेशींच्या बेकायदेशीर वस्त्या आढळून येतात.

बांगलादेशी असे पोहोचतात

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमार्गे त्रिपुरा राज्यात येतात. तेेथून दिल्लीत पोहोचतात. दिल्लीत बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मेघालय, हिमाचल, केरळ या राज्यांमध्ये विखुरले जातात. मागील काही वर्षांचा विचार केल्यास, महाराष्ट्रात बांगलादेेशी केेवळ मुंबई आणि पुण्यात राहण्यास प्राधान्य देत होते. मात्र, तेथील महागाईचा दर लक्षात घेता, त्यांनी आपले बस्तान नाशिक, मालेेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये बसविण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरहून कर्नाटक राज्यात घुसखोरी करणे शक्य असल्याने, तेथेही बांगलादेशींचा ओढा वाढत आहे.

कागदपत्रांसाठी असे आकारले जातात पैसे

  • आधारकार्ड - 15,000 रुपये

  • मतदानकार्ड - 10,000 रुपये

  • जन्मदाखला - 12,000 रुपये

  • पॅनकार्ड - 3,000 रुपये

  • पासपोर्ट - 30,000 रुपये (बांगलादेशी घुसखोर या कागदपत्रांचा वापर भाड्याचे घर, नोकरी, बँकेचे खाते, गॅस जोडणीसाठी करतात)

पासपोर्टचा गैरवापर

एजंटकडून २५ ते ३० हजारांत भारतीय पासपोर्ट तयार करून दिला जातो. पुढे बांगलादेशी या पासपोर्टच्या आधारे भारतीय असल्याचे सांंगून सौदीमध्ये नोकऱ्या मिळवितात. अर्थात हे सर्व काही एजंट करून देतात. त्यासाठी ५ ते ७ लाख रुपये आकारतात. बरेच बांगलादेशी बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे ब्रिटनमध्येही पाठविलेे जातात. बांंगलादेेशच्या तुलनेेत भारतीयांसाठी आखाती देश तसेच ब्रिटनमध्ये अधिक सुविधा असल्यामुळे त्याचा लाभ बांगलादेशी घेतात.

बांगलादेशींसाठी 'घर का भेदी'

'घर का भेदी लंका ढाए' याप्रमाणे काही भारतीयच एजंट होऊन या बांगलादेशींना मदत करतात. यामध्ये ई-सेवा केंद्रचालक तसेच न्यायालयातील काही लिपिकांचा सहभाग असल्याचे यापूर्वीच्या पोलिस कारवाईत समोर आले आहेे. एकदा का बांगलादेशींंना बनावट कागदपत्रे मिळाली की, ते याचा वापर गैरकृत्यांसाठीही करतात. काही घुसखोर बांगलादेशी 'टेरर नेटवर्क'मध्येही सहभागी होतात. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे.

यासाठी बांगलादेशी करतात घुसखोरी

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे तेथील नागरिक अन्य देशांमध्ये विशेषत: भारतात घुसखोरी करतात. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे भारतात दोन कोटी बांगलादेशी राहतात. भारतातील चांगले राहणीमान त्यांच्यासाठी नेहमीच आकर्षण ठरलेे आहे. भारतात मेट्रो रोड कॉरिडॉर, रस्ते, बांधकाम या क्षेत्रांत मनुष्यबळाची वाढती मागणी असल्याने, बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात. तसेच मजुरी, अकुशल कामगार, शेती या क्षेत्रांतील बांगलादेशी बनावट कागदपत्रांंच्या आधारे कार्यरत आहेत.

बांगलादेेशी नाशिकमध्ये व्हाया सुरत

सहा महिन्यांत १३ ताब्यात बांगलादेशी नाशिकमध्ये प्रामुख्याने मुंबई किवा सुरतमार्गे पोहोचतात. मागील सहाच महिन्यांत १३ बांंगलादेशींना अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आडगाव शिवारात बांधकाम साइटवर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेशांतर करीत ६०० कामगारांच्या घोळक्यातून आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. ११ जून २०२५ रोजी सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमासाठी बांगलादेशातून छुप्या मार्गाने सुरैया अक्तर ऊर्फ श्रेया केदारे हिने प्रवेश केला होता. पोलिस तपासात तिनेे पाच- सहा वेळा अनधिकृतरीत्या बांगलादेशातून भारतात प्रवेश केेल्याचे उघड झाले होते. २० जुलै २०२५ रोजी अमृतधाम परिसरातील खैरे मळ्यात धाड टाकून चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेल्या २२ जुलै रोजी पंचवटीतील खैरे मळा येथून चार बांगलादेशी महिलांना अटक केली. या महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. जेव्हा जेव्हा याबाबतची माहिती मिळते, तेव्हा तेव्हा पोलिसांकडून कारवाई केली जातेे. याशिवाय कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातूनही शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेतला जाताे.

मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

प्रत्येक बांंधकाम कामगाराची नोंदणी केली जावी यासाठी आम्ही कंत्राटदाराकडे आग्रह नव्हे, तर सक्तीच करत असतो. नोंदणी करताना त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी होते. याशिवाय आम्हीही कंत्राटदाराकडून प्रत्येक कामगाराविषयीची सखोल माहिती घेत असतो.

सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको.

बांधकामासाठी कंत्राटदाराकडून कामगार पुरवले जातात. त्यात कंत्राटदाराने कामगारांच्या सर्व कागदपत्रांंची पडताळणी केली काय? याबाबतची माहिती आम्ही घेत असतो. याशिवाय क्रेडाईच्या माध्यमातून सर्व कामगारांची नोंदणी 'बीओसीडब्ल्यू'मध्ये केली जाते. यावेळी सर्वच कागदपत्रांची पडताळणी होते.

गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई.

आमच्याकडे आलेल्या प्रत्येक कामगाराकडून आधारकार्डसह अन्य कागदपत्रांची मागणी केली जाते. याशिवाय ही कागदपत्रे खरी की खोटी हेदेखील पडताळले जाते. या कागदपत्रांंच्या आधारे कामगार उपायुक्ताकडे नोंदणी केेली जाते. त्याठिकाणीही पडताळणी होते. मात्र, अशातही कोणी बनावट कागदपत्रांच्या आधारे कामे मिळवत असेल, तर त्याला नाइलाज असतो.

एक कंत्राटदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news