

देवळा : शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो ,मात्र त्याला त्याने पिकविलेल्या मालाचा नफा कळत नाही हे दुर्दैव आहे .कांद्यासह इतर पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला असून, त्यांना शेतकऱयांशी काही घेणे देने नाही .अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची अद्याप भरपाई मिळाली नसून, कर्जमाफीचा विषय तर लांबच राहिला .यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीत धापेमार सरकारला मतदान करू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिला .
शनिवारी दि २७ रोजी सकाळी ९ वाजता बच्चू कडू यांनी ऐतिहासिक कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी बनविण्यात आलेल्या शिव विजयस्तंभ येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला हजेरी लावली . या दौऱ्यात त्यांनी खर्डे येथे आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली .यावेळी ते बोलत होते .ते पुढे म्हणाले की , ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्ष वाल्यांनी गुरफटून मारून टाकले आहे .हे शेतकऱ्यांना कळत नाही .त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका असे त्यांनी सांगितले .
यावेळी प्रहारचे गणेश काकुळते , शशिकांत पवार , भाऊसाहेब मोरे ,माधव ठोंबरे आदिंसह मधुकर देवरे ,विजय जगताप , संजय शिंदे ,सुभाष जाधव , बापू देवरे , भाऊसाहेब देवरे , त्रंबक जाधव , अशोक गांगुर्डे , सुनील जाधव , शशी ठाकरे ,सचिन गांगुर्डे ,गिरीश पवार , केदा पवार , तुषार जाधव , कैलास पगार , सुभाष पवार ,पंकज आहेर,बापू पवार ,अशोक पवार ,बबलू पवार ,बाळासाहेब आहेर , रामभाऊ आहेर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .