Lok sabha Election 2024 Result : “आया रे राजा लोगो रे लोगो”! निकालापूर्वीच राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा जल्लोष पहा फोटो …

नाशिक : राजाभाऊ वाजे समर्थक विजयाच्या गुलालाची उधळण करत आहेत. (छाया - हेमंत घोरपडे)
नाशिक : राजाभाऊ वाजे समर्थक विजयाच्या गुलालाची उधळण करत आहेत. (छाया - हेमंत घोरपडे)

Nashik Lok Sabha Election Results 2024 Live | "आया रे राजा लोगो रे लोगो"! निकालापूर्वीच राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा जल्लोष पहा फोटो … (सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे)

14 वी फेरीत अखेर राजाभाऊ वाजे हे 147012 मतांनी आघाडीवर आहेत. चौदाव्या फेरी अखेर नाशिक मधून वाजे यांना 1,22,723 मतांची आघाडी असल्याने राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात असून नाशिककरांनी निष्ठेचा फळ दिल्याचे राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी वाजे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे.

माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नाशिककर जनता आणि महाविकास आघाडीचे नेते आणि

कार्यकर्त्यांना आहे. नाशिकच्या जनतेने असली शिवसेना आणि नकली शिवसेनेचा फैसला करून दिलेला आहे. माझा विजय निश्चित होता याची मला खात्री होती नाशिककरांच्या मदतीने आज मी मोठी लढाई जिंकली आहे. आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. माझ्या विजयासाठी सिन्नरच्या जनतेने संपूर्ण मतदारसंघात प्रचार करून मला विजयापर्यंत पोहोचवले आहे. आजचा आनंद उत्सव साजरा केल्यानंतर उद्यापासून मी नाशिककरांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे – राजाभाऊ वाजे

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news