विधानसभा 2024 | झिरवाळ यांची 'हॅटट्रिक' की महाविकास आघाडी बदलाची 'ट्रिक' ?

दिंडाेरी विधानसभा मतदार संघ : झिरवाळांची हॅटट्रिक होणार की महाविकास आघाडी परिवर्तन घडविणार
दिंडाेरी विधानसभा मतदार संघ
दिंडाेरी विधानसभा मतदार संघ विधानसभा 2024 pudhari news network
Published on
Updated on

दिंडोरी : अशोक निकम

दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुर्नरचनेत दिंडोरी-पेठ असा नवा मतदारसंघ निर्माण झाला. हा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे धनराज महाले यांनी १४९ मतांनी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांचा पराभव करत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावला. मात्र, २०१४ मध्ये झिरवाळ यांनी शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले, काँग्रेसचे उमेदवार रामदास चारोस्कर यांचा पराभव करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा वर्चष्मा सिद्ध केला. २०१९ मध्येही ही परंपरा कायम राहिली.

आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने राज्यात नवीन समीकरण तयार झाले आहे. झिरवाळांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. माजी आमदार धनराज महालेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही काँग्रेसचा हात सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दिंडोरी दौऱ्यावर आले असता त्यांनी झिरवाळांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती, त्यावर शिंदे गटाकडून ईच्छुक असलेल्या माजी आमदार महाले यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही तयारी सुरू केली आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही अनेक इच्छूक असल्याने महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागा मिळविण्यासाठी चूरस दिसून येत आहे.

झिरवाळांना घरातूनच आव्हान?

आमदार नरहरी झिरवाळ यांचे सुपूत्र गोकुळ झिरवाळ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छूक आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांनी चर्चाही केली आहे.त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना घरातूनच आव्हान मिळणार का? याविषयी सध्या सुरू आहेत. या बरोबरच शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता चारोस्कर, प्राचार्य अशोक बागुल,अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे, कै. माजी आ. भगवंतराव गायकवाड यांचे पुतणे स्वप्निल गायकवाड हेही लढण्यास इच्छूक आहेत.

२०१९ मधील स्थिती अशी..

  • नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी- १२४५२०,

  • भास्कर गावित, शिवसेना - ६३७०७,

  • अरुण गायकवाड, वंचित- १३४७६,

श्रीराम शेटेंच्या भूमिकेकडे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद यात्रेची सुरुवात दिंडोरीतून करत एकप्रकारे विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे कटआऊट झळकले. तसेच नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस कादवा कारखाना कार्यस्थळावर साजरा झाला. त्यानंतर अजित पवार व सुनील तटकरे यांनी श्रीराम शेटे यांची घेतलेली सदिच्छा भेट यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

दिंडाेरी विधानसभा मतदार संघ
विधानसभा 2024| तिसऱ्यांदा कमळ फुलणार की, आघाडीचा डंका वाजणार?

पेठची भूमिका ठरणार निर्णायक?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भास्कर गावित यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी प्रांतवादाचा मुद्दा पुढे करण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या झिरवाळ यांनी विजय मिळविला असला तरी भाविक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. आता सर्वात जास्त इच्छूक दिंडोरी तालुक्यातील असल्याने पेठ तालुक्यातील मतदाराची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news