Asmita Khelo India : अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात

मनमाड शहरात प्रथमच महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मनमाड  (नाशिक)
मनमाड : येथील वेटलिफ्टिंग स्पर्धेतील एक क्षण - सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मेघा संतोष आहेर हिने पटकावलाPudhari News Network
Published on
Updated on

मनमाड (नाशिक) : भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय वेटलिफ्टिंग संघटना, नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना आणि जय भवानी व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात प्रथमच आयोजित अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे, छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोद्दार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, जय भवानी व्यायामशाळेचे पोपट बेदमुथा, डॉ. दत्ता शिंपी, राजेश परदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता काळे, आकांक्षा व्यवहारे व प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते झाले.

सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मेघा संतोष आहेर हिने पटकावला. तांत्रिक अधिकारी म्हणून डॉ. विजय देशमुख, राजेंद्र सोनवणे, सुनील दळवी, योगेश चव्हाण, योगेश महाजन, तुषार सपकाळे, कल्पेश महाजन, भाऊसाहेब खरात, पंकज त्रिवेदी यांनी काम पाहिले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी सहभागी खेळाडूंना टी-शर्ट दिले. विनोद सांगळे यांनी त्यांचे वडील कै. बंडू नानासांगळे यांचे स्मरणार्थ स्मृतीचिन्ह प्रदान केले. डॉ. शरद शिंदे, माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनी स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिले. प्रास्ताविक प्रवीण व्यवहारे, सूत्रसंचालन आनंद काकडे यांनी केले. आभार प्रशांत सानप यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुणाल गायकवाड, मुकेश निकाळे, मुकुंद आहेर, जयराज परदेशी, पूजा परदेशी, खुशाली गांगुर्डे, नूतन दराडे, पवन निर्भवणे, सुनील कांगणे, सुरेश नेटारे यांनी परिश्रम घेतले. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतूक केले.

मनमाड  (नाशिक)
Nagpur - Pune Vande Bharat Train : नागपूर - पुणे वंदे भारत ट्रेनचे मनमाडला स्वागत

आठ वजनी गटांतील विजेते

  • 44 किलो : प्रथम दिव्या सोनवणे, द्वितीय श्रेया सोनार, तृतीय भाग्यश्री पवार.

  • 48 किलो : प्रथम विनाताई आहेर, द्वितीय श्रावणी पुरंदरे, तृतीय वैष्णवी शुक्ला.

  • 53 किलो : प्रथम मेघा आहेर, द्वितीय पूर्वा मौर्य, तृतीय शामल तायडे.

  • 58 किलो : प्रथम आर्या पगार, द्वितीय मुग्धा माळी, तृतीय कावेरी वाबळे.

  • 63 किलो : प्रथम प्रांजल आंधळे, द्वितीय साक्षी पवार, तृतीय हर्षिता कुंगर.

  • 69 किलो : प्रथम अक्षरा व्यवहारे, द्वितीय श्रावणी सोनार, तृतीय श्रावणी मंडलिक.

  • 77 किलो : प्रथम करुणा गाढे, द्वितीय प्रांजल कुनगर, तृतीय ऐश्वर्या गांगुर्डे.

  • 77 किलो वरील : प्रथम कस्तुरी कातकडे, द्वितीय श्रद्धा माळवतकर, तृतीय करिष्मा शहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news