Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; पोलीस कोठडीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय!

Ashok Kharat Case |पाचव्‍या गुन्‍ह्यासाठी २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Case

नाशिक : फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने खरातला पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आता २३ एप्रिलपर्यंत तो एसआयटीच्या (SIT) ताब्यात असणार आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपासासाठी कोठडीची गरज

पाचव्या गुन्ह्यामध्ये खरातवर लैंगिक शोषण आणि भोंदूगिरीचे आरोप आहेत. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. पीडित महिलेला गुंगीकारक औषधे आणि इतर पदार्थ नेमके कोठून आणून देण्यात आले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच, अत्याचाराच्या या घटनांमध्ये खरातला घरातील इतर कोणाचे सहकार्य लाभले होते का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली होती.

Ashok Kharat Case
Ashok Kharat case | भोंदू खरातविरोधात ठोस पुरावे; ४६५० लिंक्स हटविल्या : SIT प्रमुख सातपुतेंनी दिली तपासातील मोठी अपडेट

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद

खरातचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला. यापूर्वी दाखल झालेल्या चारही गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याची पद्धत सारखीच आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला.मात्र, सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद खोडून काढताना सांगितले की, प्रत्येक गुन्ह्यातील पीडिता वेगळी असून प्रत्येक प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे होणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Ashok Kharat Case
Ashok Kharat case: अशोक खरातचा धक्कादायक प्रताप; 'मासा ही जलवनस्पती' असल्याचे सांगून शाकाहारी भक्तांना द्यायचा खायला

एसआयटीकडून सखोल चौकशी

अशोक खरातवर एकामागून एक गंभीर गुन्हे दाखल होत असल्याने या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) केला जात आहे. २३ एप्रिलपर्यंतच्या या कोठडीत एसआयटी त्‍याची सखोल चौकशी करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news