Ashok Kharat Nashik Scam 2026 | अशोक खरातचा धक्कादायक बनाव! आमदाराच्या पुतणीशी मैत्री जमवली अन् मग 20 कोटी उकळले

Ashok Kharat Nashik Scam 2026 | उद्योगपतीसह आमदार पुतणीला ब्लॅकमेल; भोंदू खरातकडून धक्कादायक 'सेटअप' उघड
Ashok Kharat Nashik Scam 2026
Ashok Kharat Nashik Scam 2026
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातच्या विरोधातील प्रकरणात आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच तो अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. या नव्या प्रकारामुळे खरातच्या कारवायांची व्याप्ती अधिकच व्यापक आणि गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

Ashok Kharat Nashik Scam 2026
Unseasonal Rain Nashik | गारपिटीमुळे वातावरणात गारवा, उन्हापासून दिलासा

मिळालेल्या माहितीनुसार, एका उद्योगपतीने वैयक्तिक समस्येवर मार्गदर्शन घेण्यासाठी खरातच्या कार्यालयाला भेट दिली होती. याच वेळी खरातने त्याची ओळख एका आमदाराच्या पुतणीशी करून दिली होती. दोघांनी एकमेकांशी ओळख वाढवावी, मैत्री करावी आणि जवळीक निर्माण करावी, असा सल्ला दिला.

तुम्ही जर एकमेकांशी मैत्री केली, तर निश्चितच तुमचे जीवन आनंदमय होईल, असे त्यांना सांगितले होते. त्याने त्यांना एकत्र आणले. पुढील काही महिन्यांत दोघांमध्ये संबंध दृढ झाले आणि ते रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही काळानंतर खरातने हस्तक्षेप करत त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यास सुरुवात केली.

Ashok Kharat Nashik Scam 2026
Crude Oil Price Hike | युद्धाचा भडका! कच्च्या तेलाने ओलांडली 110 डॉलर्सची पार, भारतात इंधन दरवाढीचा धमाका

संबंधित तरुणीला उद्योगपतीकडे आपण गर्भवती असल्याचे सांगण्यास भाग पाडण्यात आले. ही माहिती मिळताच उद्योगपतीने घाबरून खरातशी संपर्क साधला. त्यावेळी खरातने परिस्थिती गंभीर असल्याचे भासवत, 'तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल' असे सांगून प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल २० कोटी रुपये देण्याचा सल्ला दिला होता. भीतीच्या वातावरणात अडकलेल्या उद्योगपतीकडून ही मोठी रक्कम उकळण्यात आल्याचे सांगितले जाते.

काही महिन्यांनंतर या दोघांची योगायोगाने पुन्हा भेट झाली असता संपूर्ण कट उघडकीस आला. तरुणीने आपण गर्भवती नव्हते आणि तसे सांगण्यास भाग पाडले गेले होते, असे स्पष्ट केले. या प्रकारातून भोंदू खरातने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दोघांची फसवणूक करत कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे खरातच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारे आणखी किती जणांना जाळ्यात अडकवण्यात आले असावे, याबाबतही तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news