Nashik Ashok Kharat Case | खरातच्या कारनाम्यामुळे भक्तांना मोठा धक्का

Nashik Ashok Kharat Case | नाशिकसह राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंद अशोक खरात प्रकरणात धक्कादायक आर्थिक गैरप्रकार समोर आले आहेत.
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकसह राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंद अशोक खरात प्रकरणात धक्कादायक आर्थिक गैरप्रकार समोर आले आहेत. भक्त असल्याचा फायदा घेत खरात याने त्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित खातेदारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ज्याला आपण गुरुस्थानी, देवतुल्य आणि आयुष्याचा मार्गदर्शक मानत होतो, त्याच व्यक्तीने आपल्या भक्तीचा गैरफायदा घेतल्याने अनेक जण हतबल झाले असून, विश्वासघाताची भावना तीव्र झाली आहे.

Ashok Kharat Case
Sanjivani Sugar Factory | संजीवनीचा धूर थांबला अन् ऊस शेतीही सुकली! गोव्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येत 50 टक्के घट

अशोक खरातचे हजारो भक्त असून, त्याला अनेक जण देवस्थानी मानत होते. त्याच्याकडे येणारा भक्तवर्ग प्रामुख्याने उच्चभ्रू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. आयुष्यातील ताणतणाव कमी करणे, वैयक्तिक समस्या सोडवणे किंवा भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे लोक त्याच्याकडे येत असत.

खरातने या भावनिक नात्याचा गैरफायदा घेत भक्तांकडून फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी केवायसी कागदपत्रे गोळा केली. त्यानंतर त्यांच्या नावाने बनावट खाती उघडून स्वतःला नॉमिनी म्हणून नोंदवले. सामान्यतः नॉमिनी म्हणून कुटुंबातील सदस्यांची नोंद केली जाते; मात्र येथे स्वतःचे नाव टाकल्याने संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, महिला लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

Ashok Kharat Case
Nashik IT Company Conversion Case | धर्मांधता अन् त्यातून शोषण हे अस्वीकारार्हच !

या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, त्याच्याशी संबंधित काही राजकीय व्यक्तीही अडचणीत आल्याची चर्चा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे समोर आले असून, त्या सध्या चौकशीच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात समता पतसंस्थेचे नावही पुढे आले असून, येथे १०० हन अधिक बनावट खाती उघडण्यात आल्याचा संशय आहे. साधारणतः खाते उघडताना संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते; मात्र केवळ कागदपत्रांच्या आधारे खाती उघडली गेली असतील, तर संबंधित संस्थेची भूमिकाही संशयास्पद ठरते. त्यामुळे या प्रकरणात संस्थेवरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक नुकसान कसे हाताळायचे

याबाबत संभ्रमात या सर्व प्रकारामुळे संबंधित भक्त परिवारांमध्ये भीती, तणाव आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक जण मानसिकदृष्ट्या खचले असून, पुढील कायदेशीर अडचणी आणि आर्थिक नुकसान कसे हाताळायचे याबाबत ते संभ्रमात आहेत. श्रद्धेच्या नावाखाली झालेल्या या विश्वासघातामुळे अंधश्रद्धेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news