Ashok Kharat Case Entrepreneur Kute | व्यावसायिक स्पर्धेतून उद्योजक कुटे यांचा बळी घेण्याचा प्रयत्न?

बदनामी प्रकरणी तक्रार अर्ज दाखल
Ashok Kharat
Ashok Kharat Casepudhari photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातील हॉटेल व्यावसायिक, उद्योजक शैलेश कुटे यांना खरात प्रकरणी चौकशी करत असलेल्या एसआयटीकडून पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पाचारण करण्यात आले होते. कुटे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिक स्पर्धेतून तसेच कुटे कुटुंबीयांनी अल्पावधीत हॉटेल व्यवसायात केलेल्या प्रगतीच्या असूयेतून त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे का? असा संशय व्यक्त होत आहे. त्यातूनच कुटे यांच्या संदर्भातील चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरविल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ashok Kharat
Nashik Drug Seizure - वर्षभरात ६८ कोटींचे अमली पदार्थ जप्त

खरात आणि कुटे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फोन कॉल्स झालेले नव्हते, तसेच कुठल्याही व्यवहारात दोघे सोबत नव्हते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शैलेश कुटे यांच्याशी पुढारीने संपर्क साधाला. तेव्हा ते म्हणाले, की अशोक खरातने मला त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. मात्र मी लग्नालाही गेलो नव्हतो. दरम्यान, समाजमाध्यमांवर बदनामी केल्यासंदर्भात शैलेश कुटे यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात पुण्यातील पत्रकाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे.

अनेक माध्यमांनी वस्तुस्थिती समजावून न घेता एकतर्फी बातम्या छापल्या व प्रसारित केल्या. त्यातून समाजात गैरसमज निर्माण झाल्याने अशा माध्यमांबाबत पोलिसांत धाव घेणे भाग पडल्याचे शैलेश कुटे यांनी स्पष्ट केले. कुटे यांची कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या फर्मने दिलेल्या माहितीनुसार त्यांची एसआयटीची चौकशी नव्हती, तर खरातबद्दल अधिक माहिती प्राप्त होते का? या चाचपणीसाठी त्यांना पाचारण केले होते.

Ashok Kharat
Nashik Outer Ring Road Construction - बाह्य रिंगरोड कामाचा लवकरच होणार शुभारंभ

मी गेले अनेक वर्षे राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. मात्र, या आधी तसेच आत्तादेखील जाणीवपूर्वक चिखलफेक केली गेली. माझ्या नावाचा वापर काही विशिष्ट लोकांकडून चुकीच्या संदर्भात आणि चुकीच्या पद्धतीने केला गेला. जी मंडळी या सगळ्या प्रकारांमध्ये सामील आहेत, त्यांना कायदेशीर मार्गान धडा शिकविणार आहे.

- शैलेश कुटे, व्यावसायिक तथा उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news