Ashok Kharat case|८५ लाखांची फसवणूक; खरातची रवानगी कारागृहात

८ कोटी ७६ लाखांच्या खंडणी प्रकरणात सोमवारी एसआयटी घेणार ताबा
Ashok Kharat
Ashok Kharat pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : ८५ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीची मुदत संपल्याने भोंदू अशोक खरात उर्फ कॅप्टन याची रवानगी शुक्रवारी (दि. ९) जिल्हा न्यायालयाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली.

दरम्यान, वरळीतील सनदी लेखापाल ललित पोकळे यांना अघोरी विद्या आणि मृत्यूची भीती दाखवून ८ कोटी ७६ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष तपास पथक सोमवारी (दि. १२) खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील कांदा व्यापारी विशाल सूर्यभान बर्के यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी ८५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी खरात आणि बर्के यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या महत्त्वपूर्ण नोंदी हस्तगत केल्या आहेत. संबंधित व्यवहार आणि बँक खात्यांतून पैसे काढल्याच्या नोंदींच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. गौळाणे परिसरातील भूखंडाच्या व्यवहारातून बर्के हे खरातच्या संपर्कात आले होते. त्यानंतर भविष्यात मोठा व्यापारी होशील, असे भाकीत सांगत खरातने त्यांचा विश्वास मिळवला होता.

६०० वारांचा भूखंड देण्याचे आमिष दाखविण्यात आले. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ८५ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

दरम्यान, खरातविरोधातील अन्य एका खटल्यात गुरुवारी (दि. ८) सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

Ashok Kharat
Nashik | दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत नाशिकचे आणखी तीन तालुके

खरातच्या अडचणींत आणखी भर

नेवासा येथील व्यापाऱ्याच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी बर्के यांच्या फसवणूक प्रकरणात खरातला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच, आता पोकळे यांच्या खंडणी प्रकरणात एसआयटीकडून खरातचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील या प्रकरणी तपास करत आहेत

Ashok Kharat
Nashik Ashram schools |१,०५८ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news