Nashik Municipal Corporation - 'स्वीकृत'च्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला!

Nashik Municipal Corporation nominated members appointment | 'स्वीकृत'च्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला!
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. महापालिका प्रशासनाने दहा सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे. पक्षीय संख्याबळानुसार भाजपला सहा, शिवसेना-मनसे आघाडीला दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-काँग्रेस आघाडीला दोन जागा मिळणार आहेत.

Nashik Municipal Corporation
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | साधुग्राममध्ये दहा लाख साधू-भाविकांसाठी जलव्यवस्था

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली होती. या निवडणुकीत ३१ प्रभागांतून १२२ नगरसेवक निवडून आले. महापालिका अधिनियमानुसार, स्वीकृत नगरसेवकांची संख्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा किंवा दहापेक्षा अधिक असू शकत नाही. त्यामुळे महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्ती प्रक्रियेला विलंब होत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation| मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासाला ४७ कोटींचे बळ

न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात सहा आठवड्यांच्या आत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू करत राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया राबविली.

या प्रक्रियेत दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. काँग्रेसचा अर्ज छाननी समितीने नाकारला आहे. आता २० नोव्हेंबरच्या महासभेतील अधिकृत घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रस्तावित स्वीकृत नगरसेवक

भाजप (६)

रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, चंद्रशेखर पंचाक्षरी.

शिवसेना (२)

चंद्रकांत लवटे, विनायक आढाव.

शिवसेना उबाठा (२)

हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.