Ramkund to Malegaon Stand | रामकुंड ते मालेगाव स्टँड मार्गावर अतिक्रमण हटवले

Ramkund to Malegaon Stand | या प्रमुख मार्गावरील टपऱ्या, पत्राचे शेड आणि लोखंडी रेलिंग हटवून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्ते मोकळे केले आहेत.
Ramkund to Malegaon Stand
Ramkund to Malegaon Stand
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौर्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने मालेगाव स्टँड ते रामकुंड रस्त्यावरील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली. या प्रमुख मार्गावरील टपऱ्या, पत्राचे शेड आणि लोखंडी रेलिंग हटवून पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्ते मोकळे केले आहेत.

Ramkund to Malegaon Stand
Kumbh Mela Nashik | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामघाट, पंचवटी व कुशावर्त परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याने शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीस अडथळामुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान मडकी विक्रेत्यांनी थाटलेल्या तात्पुरत्या टपऱ्या, पत्राचे शेड आणि लोखंडी जाळ्या हटवल्या.

Ramkund to Malegaon Stand
Panchavati Express delay | रेकच्या पळवापळवीने पंचवटी एक्स्प्रेसला विलंब

तसेच इंद्रकुंड परिसरातील रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत रेलिंग आणि लगच्या इमारतींना लावलेल्या बेकायदेशीर जाळ्या जेसीबीच्या साहाय्याने काढल्या.
कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आणि पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली. मोहिमेत पंचवटी विभागाचे गाडीप्रमुख प्रवीण बागूल, उमेश खैरे, नंदू खांडरे, दत्ता आहेर, राजू साळुंखे, जावेद शेख, जगन्नाथ सागर, कटले, विजय गरूड यांच्यासह मनपाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्त तैनात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news