नाशकात डेंग्यूचा दुसरा बळी

डेंग्यूच्या उद्रेकामुळे नाशकातील बळींची संख्या दोनवर
Dengue
डेंग्यू प्राणघातक आहेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : येथे स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढला असून, गंगापूर रोडवरील २९ वर्षीय डेंग्यूसदृश रुग्णाचा या आजाराने बळी घेतल्याने शहरातील डेंग्यू बळींची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. जून महिन्यात डेंग्यूचे विक्रमी १६१ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा २७१ वर गेला आहे.

शहरात दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. यंदा मात्र पावसाळ्याच्या तोंडावरच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी शहरात १,१९१ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यापैकी तिघांचा डिसेंबर २०२३ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मे २०२४मध्ये शहरात ३९ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. पाठोपाठ जूनमध्ये तर डेंग्यूचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

Dengue
नाशिकमध्ये डेंग्यूचा आलेख चढताचPudhari News Network

जूनच्या पहिल्या आठवड्यात गोविंदनगरमधील ५० वर्षी व्यक्तीचा डेंग्यूसदृश आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी गंगापूर रोडवरील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू डेंग्यूसदृश आजारामुळे झाला आहे. या रुग्णाचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. जानेवारीपासून आतापर्यत शहरात तब्बल २७१ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

Dengue
डेंग्यू प्राणघातक ठरू शकतो; पाहा काय आहेत लक्षणे? तज्ञ म्‍हणाले...

घरोघरी तपासणी सुरू

गेल्या सहा महिन्यांतच शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा २७१वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेने डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी सुरू केली आहे. डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या १३० नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्यांविरोधात थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news