Nashik News |भोंदूगिरीला विज्ञानाचे आव्हान! चमत्कार सिद्ध करा अन् 21 लाख जिंका; 'अंनिस'चे थेट चॅलेंज

Nashik News | भोंदूबाबांना अंनिसचे जाहीर आव्हान
Black Magic Harassment
Black Magic HarassmentFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रचार, प्रसार होऊनदेखील भोंदूबाबांकडून चमत्कार दाखविण्याचा दावा केला जात आहे. चमत्कार दाखवित असल्याचे भासवून आजही राज्यातील कानाकोपऱ्यात सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करण्याचे काम सुरूच आहे.

Black Magic Harassment
Nashik Cyber Crime | एक रुपयाच्या बहाण्याने लाखोंचा डल्ला

या भोंदूबांबानी चमत्कार दाखवावा व २१ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवावे, असे थेट आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अंनिसने याबाबतचे प्रसिद्धिपत्रक जारी करून भोंदूबाबांना आव्हान दिले आहे. पत्रकात नमद केले की, स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून तंत्र- मंत्र, चमत्कार, दैवी तोडगे याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या लोकांचे विविध प्रकारे शोषण हे भोंदूबुवा करतात.

हे अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंनिस मागील ३७ वर्षांपासून संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम करीत आहे. परिणामी समाजातील अनेक अनिष्ट, अघोरी, अमानुष रूढी, प्रथा थांबवण्यात संघटनेला बऱ्यापैकी यश मिळालेले आहे.

अनेक अंधश्रद्धांबद्दल मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती करण्यात अंनिस यशस्वी झालेली आहे. मात्र तरीही, अनेक भोंदूबुवा देव, धर्म, अध्यात्म्याच्या नावाने भोंदूगिरी करतात. चमत्कारांचा दावा करतात.

अशा तमाम चमत्काराचा दावा करून भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबांना महाराष्ट्र अंनिसचे जाहीर आव्हान आहे की त्यांनी, त्यांचे चमत्कारांचे दावे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर व संघटनेचे नियम अटी शर्ती पाळून सिद्ध करावेत.

Black Magic Harassment
Farmers Protest Nashik | लासलगावात कांद्याचा 'वांदा'! दर 500 रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

असे केल्यास त्यांना संघटनेने या आव्हानासाठी ठेवलेली २१ लाखांची रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. तत्पूर्वी तमाम लोकांनाही नम्र आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्वतः अशा चमत्कारांना, अंधश्रद्धांना बळी पडू नये.

भोंदूबाबांच्या नादी लागू नये. असा भोंदूगिरीचा प्रकार कुठे घडत आहे, असे दिसून आले तर तत्काळ पोलिसांना कळवावे किंवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना कळवावे. पत्रकावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news