Mahashivratri 2026 | महाराष्ट्रातील एकमेव 'श्रीयंत्र' स्थित शिवपिंडी; 1100 वर्षांचा वारसा जपणाऱ्या वेल्हाळेत शिवभक्तीचा जागर

Mahashivratri 2026 | अभिमानास्पद! श्रीयंत्रावरील पिंडीचा अकराशे वर्षांचा इतिहास; महाशिवरात्रीला ५५०१ पिढ्यांच्या पूजनाचा महाकुंभ; गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून फुंकली संजीवनी!
Mahashivratri 2026
Mahashivratri 2026
Published on
Updated on

जळगाव

'ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा...' या आरतीतील शब्दांची प्रचिती देणारे आणि ११०० वर्षांचा देदीप्यमान इतिहास अंगाखांद्यावर मिरवणारे भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील श्री कपिल्लेश्वर महादेव मंदिर आहे. महाराष्ट्रामधील एकमेव श्रीयंत्रावरील महादेवाची पिंड असलेले हे मंदिर आहे. भारतामध्ये चार ठिकाणी श्रीयंत्रावरील महादेवाची पिंड आहे, त्यामधील महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणजे भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावातील आहे.

Mahashivratri 2026
Kadamba Smart Bus Goa | कदंब महामंडळाचा हायटेक अवतार! आता मोबाईल अ‍ॅपवर मिळणार बसचे 'लाईव्ह लोकेशन'

या पुरातन हेमाडपंती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे शिवधनुष्य गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी पेलले असून, आता हे मंदिर खऱ्या अर्थाने कात टाकत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या मंदिरात यंदाच्या महाशिवरात्रीला ५,५०१ पिंडींच्या पूजनाचा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा

११ व्या शतकातील हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामातील (हेमाडपंती) असून, याच्या भिंतीवर देवी-देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील 'पिंडी'.

भारतातील केवळ मोजक्या चार ठिकाणी श्रीयंत्रावर शिवाची पिंडी असून, केरळ राज्यानंतर महाराष्ट्रात फक्त वेल्हाळे येथेच असा दुर्मिळ योग पाहायला मिळतो. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट या पिंडीवर पडतात, जे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.

लोकाग्रहातून जीर्णोद्धाराचा धडाका

प्रशासकीय उदासीनतेमुळे या मंदिराची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. मात्र, आपल्या गावचा हा अमूल्य वारसा नष्ट होऊ नये, यासाठी गेल्या वर्षापासून गावातील तरुण आणि ग्रामस्थ एकवटले आहेत.

सरकारी मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली. श्रावण महिन्यात पहिल्यांदाच पार पडलेल्या 'मुकुट प्रकट दिन' कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती, ज्यामुळे या मंदिराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Mahashivratri 2026
Jalgaon Corruption news | वाळूचा डंपर सोडला अन् 'साहेबां'नी लाचेचा घास भरवला! ममुराबादचा तलाठी, मंडळ अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

महाशिवरात्रीला भक्तीचा महाकुंभ

येत्या महाशिवरात्रीनिमित्त वेल्हाळे येथे अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ हजार ५०१ पिंडींचे एकाच वेळी पूजन करण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वेल्हाळे गावाचा उल्लेख साक्षात शंकराच्या आरतीत असल्याने या ठिकाणाला विशेष आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे.

थोडक्यात वैशिष्ट्ये:

  • कालखंड: ११ वे शतक (अकराशे वर्षे जुने).

  • वैशिष्ट्य: श्रीयंत्रावर स्थित असलेली एकमेव दुर्मिळ पिंडी.

  • निसर्ग चमत्कार: पहाटेची सूर्यकिरणे थेट पिंडीवर अभिषेक करतात.

  • भक्ती सोहळा: महाशिवरात्रीला ५,५०१ पिंडींचे सामूहिक पूजन.

पुरातन काळात दुर्लक्षित राहिलेले हे शिवस्थान आता लोकशक्तीच्या जोरावर पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर पोहोचत असून, वेल्हाळेकरांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news