Amit Thackeray Student Tour | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ३१ ऑगस्टपासून राज्य दौरा

अमित ठाकरे : अमित शाह अन् भाजप 'जेन-झी'ला घाबरले
सिडको : उत्तमनगरात वावरे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींशी चर्चा करताना अमित ठाकरे.
सिडको : उत्तमनगरात वावरे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींशी चर्चा करताना अमित ठाकरे.
Published on
Updated on

नाशिक : राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि आदिवासी आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांची स्थिती गंभीर असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. 'जेन-झी' पिढीचे प्रश्न समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ३१ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी (दि. २२) दिली.

अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी उत्तमनगर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मी राज्यातील अनेक शाळांची पाहणी केली असून, विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अनेक ठिकाणी शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत, खेळण्यासाठी मैदाने नाहीत, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था नाही. दर्जेदार शिक्षणही मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या, असे ठाकरे यांनी सांगितले. आदिवासी आश्रमशाळांमधील परिस्थितीही समाधानकारक नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारला 'जेन-झी' पिढीची भीती वाटत असल्याची टीका केली.

राज ठाकरेंची कामेही जपता आली नाहीत

नाशिकच्या रस्त्यावर फिरताना खड्यांमुळे रस्तेच दिसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. मनसे कार्यकाळात उभे राहिलेले प्रकल्प आणि विकासकामेही भाजपला जपता आली नसल्याची टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलेली विकासकामेही सत्ताधाऱ्यांना पुढे नेता आली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

सिडको : उत्तमनगरात वावरे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींशी चर्चा करताना अमित ठाकरे.
Reservation Sub-Classification Protest - 'उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण संरक्षणासाठी एकजूट टिकवा'

विद्यार्थिनींची सुरक्षा ऐरणीवर

सिडको : उत्तमनगर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अमित ठाकरे यांच्यासमोर रोडरोमिओंकडून होणाऱ्या छेडछाडीचा प्रश्न मांडला. महाविद्यालयाचे प्रवेशद्वार तसेच परिसरात टवाळखोर मुले मोठ्या संख्येने घुटमळत असून, महाविद्यालयात ये-जा करताना विद्यार्थिनींची छेड काढली जाते. शेरेबाजी केले जाते. तक्रारींची दखल घेत ठाकरे यांनी मनविसे पदाधिकारी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतील, असे आश्वासन दिले. अशा घटनांबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल. त्यानंतरही टवाळखोरांचा बंदोबस्त झाला नाही, तर मनविसेच्या माध्यमातून महाविद्यालयाबाहेर युनिट तैनात करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष तुषार जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सिडको : उत्तमनगरात वावरे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींशी चर्चा करताना अमित ठाकरे.
Aghori Ritual Crime | विवाहाचे आमिष दाखवत स्मशानात अघोरी पूजा; दोघे अटकेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news