WhatsApp Group | मेषीकर व्हॉट्सॲप ग्रुपचा मदतीचा हात

WhatsApp Group | दिव्यांग वानखेडे बंधूंसाठी चहा-नाश्त्याचे होटल सुरू करून दिले
WhatsApp
WhatsApp Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मेशी : पुढारी वृत्तसेवा
वडिलांच्या निधनांतर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या मेषी येथील दिव्यांग बापू वानखेडे आणि रवींद्र वानखेडे या बंधूना 'आम्ही मेषीकर' व्हॉट्सॲप ग्रुपने मदतीचा हात देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे. दैनिक 'पुढारी'ने २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत ५० हजार रुपये जमा केले आणि या रकमेतून दोन्ही बंधूंसाठी चहा व नाश्त्याचे छोटेसे होटल सुरू करून दिले.

WhatsApp
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड

या उपक्रमामुळे दोन्ही भावांना रोजीरोटीचे साधन उपलब्ध झाले आहे. बापू वानखेडे आणि रवींद्र वानखेडे हे दोन्हीही जन्मतः अपंग आहेत. वडिलांच्या निधनांतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. शारीरिक मर्यादांमुळे अन्य कामे करणे शक्य नसल्याने पुढील आयुष्य कसे जगायचे, असा प्रश्न त्यांना सतावत होता.

या दोघांची व्यथा दैनिक 'पुढारी'ने २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या 'वडील गेले, अपंग भावंडांचा आधार कोण?' या आशयाच्या वृत्तातून मांडली होती. हे वृत्त 'आम्ही मेषीकर' व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांपर्यंत पोहोचल्यानंतर दोन्ही बंधूंच्या परिस्थितीची चर्चा झाली. गावातील तसेच नौकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या सदस्यांनी एकत्र येत त्यांना मदत करण्याचा निर्धार केला.

WhatsApp
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यातून घडणार 'नवे नाशिक'; पुढील 40 वर्षांचा आराखडा तयार!

त्यानुसार सदस्यांनी आपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच ५० हजार रुपयांचा निधी उभा राहिला. या रकमेतून बापू आणि रवींद्र यांच्यासाठी चहा व नाश्त्याचे छोटेसे होटल सुरू करून देण्यात आले. केवळ आर्थिक मदत न करता दोन्ही बंधूंना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना शक्य होईल असा व्यवसाय सुरू करून दिला. या उपक्रमातून त्यांना रोजगार मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यास मोठा हातभार लागला आहे.

'आम्ही मेषीकर' व्हॉट्सॲप ग्रुपने यापूर्वीही कोरोना काळात गावासाठी मोठे योगदान दिले होते. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची परंपरा या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

"वडिलांच्या निधनांतर पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा या विवंचनेत आम्ही दोघे होतो. मात्र, दैनिक 'पुढारी'ने आमची व्यथा समाजासमोर मांडली आणि 'आम्ही मेषीकर' व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांनी आमच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला. दैनिक 'पुढारी' आणि 'आम्ही मेषीकर' ग्रुपचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही."

— बापू वानखेडे, मेषी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news