

नाशिक: अंबड येथील महाकाली चौकामध्ये मंदिराच्या बांधकामाला नुकसान झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला मात्र सदर घटना ही टवाळखोरांचा पाठलाग करताना झाली आहे. यामध्ये यामध्ये कुठलाही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले.
या संदर्भात स्वप्निल प्रवीण जाधव व सोहेल फारूक पठाण या दोघा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनांक ९ रविवार रोजी रात्री अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टवाळ खोरांवर कारवाई केली जात होती.
त्याच दरम्यान दोन संशयीतांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळाले व त्यांचा धक्का लागून मंदिर दत्त मंदिराला नुकसान झाले.त्यामुळे महाकाली चौकात अफवा पसरली व काही काळ या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला मात्र पोलीस यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात आणली व सदर अफवांवर विश्वास ठेवू नये.
शहरातील सामाजिक सलोखा टिकवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.. काही आक्षेपार्ह माहिती आढळल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कृपया कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.