

नाशिक : नाशिकच्या द्वारका भागातील पखाल रोड परिसरात उच्चशिक्षितांकडून ६.५ ग्रॅम एमडीसह १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फैज शब्बीर शेख (फार्मिस्ट), कार्तिक भगवान दांदडे, अदनान नूर कलाम खाटीक (इंजिनिैअर), ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन, अदनान रिजवान अन्सारी (फार्मिस्ट) ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. सर्व आरोपी पखाल रोड (द्वारका) परिसरातील रहिवासी आहे.
७ नोव्हेबरला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की, फैज शब्बीर शेख (२३, रा. अल फहाद रेसीडेन्सी, पखाल रोड) हा त्याच्या साथीदारांसह सह्याद्री हॉस्पिटलच्या सिग्नलपासून पुढे आनंद लॉन्ड्रीजवळ एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या आरोपीसह त्याचे इतर ४ साथीदारांना अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्यांकडून ६.५ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ (किंमत ३२,५००) व इतर १,६०,५०० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. ड्रग्स विक्री करण्यासाठी आलेला फैजचे वडील शिक्षक आहेत. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.