Nashik Political News | अजितदादा पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Nashik Political News | नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.
Ramkund Nashik
Ramkund Nashik
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले. स्व. पवार यांचा अस्थिकलश मंत्री भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक येथे आणला.

Ramkund Nashik
Nashik Politics | अजितदादा, पवार साहेब आणि नाशिक !

नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी हे अस्थिकलश शोकसभेत नाशिककरांच्या दर्शनासाठी ठेवले होते. यानंतर सायंकाळी रामकुंडावर त्याचे विधिवत पूजा करत विसर्जन करण्यात आले.

Ramkund Nashik
Fake Sports Certificates: खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्रांना आता बसणार आळा, 'क्रीडा ई-प्रमाणपत्रा'ची प्रत जोडणे अनिवार्य

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,

Ramkund Nashik
Namokar Mahotsav | णमोकार तीर्थ महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कॉंग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, आनंद सोनवणे, सीमंतिनी कोकाटे, समाधान जेजुरकर, शंकर मोकळ, आशा भंदुरे, सुरेखा निमसे, ज्ञानेश्वर गायकवाड, तानाजी गायधनी, नरेश पाटील, विनायक माळेकर यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news