Ajit Pawar Birthday | दिंडोरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

काळुबाबा आश्रमासाठी देणगी

Plantation
दिंडोरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणpudhari photo

शिंदवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिंडोरी तालुका पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिंडोरी पदाधिकारी यांनी आज सकाळी शिंदवड येथील काळुबाबा आश्रम येथे वृक्षारोपण केले. तसेच इतरही झाडे लागवड व संगोपन करण्यासाठी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी अकरा हजार रुपये देवून काळुबाबा आश्रमासाठी देणगी दिली.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, सुनिल शेटे, शैलेश शेटे, राहुल कावळे, संदीप गोतरणे, प्रतिक पाटील, प्रदीप निरगुडे, ललित बाऱ्हाते, मंगेश पवार, चेतन लभडे, शिंदवड ग्रामस्थ व यात्रा उत्सव कमिटी यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news