

AI is revolutionizing investment management
नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्टॉकब्रोकिंग उद्योगाने माहिती तंत्रज्ञानातील वेगवान उत्क्रांती अनुभवली असून, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या भविष्याकालीन संकल्पना राहिल्या नसून, त्यांच्यासाठी शक्तिशाली टूल्स ठरले आहेत. डेलॉइटच्या सर्वेक्षणानुसार, ८६ टक्के वित्तीय कंपन्यांनी आपल्या भावी यशासाठी एआय महत्त्वाचा घटक राहणार असल्याचे नमूद केले आहे. एआयमुळे आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार सक्षमीकरणाला वेगाने प्रोत्साहन मिळाले आहे.
एआयच्या साहाय्याने गुंतवणूक संशोधन, पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि ग्राहक सल्ला देतो येतो. अधिक जलद आणि आत्मविश्वासपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास एआय तंत्रज्ञान गुंतवणूकदारांना सक्षम करते, एआयमुळे शेअरबाजारामधील क्लिष्ट, गुंतागुंतीचे व्यवहार सर्वांच्या आवाक्यात आले आहेत.
तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीची क्लिष्ट प्रक्रिया सोपी करण्यासाठी स्काय एमसीपी (मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल) प्रणाली वापरात आणण्यात आली आहे. गुंतागुंतीची माहिती आणि प्रत्यक्षातील निर्णय यातील दरी कमी करण्यासाठी तयार केलेला हा एआय-आधारित ट्रेड आणि गुंतवणूक सहायक देशभरातील गुंतवणूकदारांना सक्षम करणारा परिवर्तनकारी घटक ठरला आहे. केवळ तंत्रज्ञानातील प्रगती नाही, तर सर्व स्तरांवर गुंतवणूकदारांना अधिकाधिक चित्र स्पष्ट करणे, सक्रिय निर्णय घेणे आणि आर्थिक प्रवासात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे ध्येय गाठण्यास एआय हातभार लावत आहे.
मार्केटची सखोल, विश्लेषणात्मक माहिती आणि प्रगत पोर्टफोलिओ धोरणे ही प्रामुख्याने कंपन्या आणि श्रीमंत व्यक्तींसाठी राखीव होती. रिटेल गुंतवणूकदारांना बहुतांश वेळा भरमसाठ माहितीचा सामना करावा लागतो. गुंतागुंतीची माहिती समजण्यायोग्य तसेच कृती करण्यायोग्य करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन साधनांची मदत घेत संभाषणात्मक एआयच्या साहाय्याने हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवले जात आहे. अनेक अहवालांमधून माहिती शोधण्याचे गुंतवणूकदाराचे श्रम वाचतात. गुंतवणूकदारांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच मार्केटमध्ये आत्मविश्वासाने व्यवहार करण्यासाठी सक्षम करते,
गुंतवणूक विश्वाची पुनर्रचना
संशोधनः कंपनीच्या नफ्याच्या अहवालांपासून ते सामाजिक भावनांपर्यंतच्या प्रचंड माहितीचे अधिक व्यापक आणि जलद विश्लेषण करणे.
पोर्टफोलिओ व्यवस्थापनः गतिमान संतुलन आणि योग्य वाटपासाठी एमएल अल्गोरिदमचा वापर करणे.
ग्राहकांना मार्गदर्शनः योग्य वेळी योग्य सल्ला तसेच सक्रिय सूचना देणारे व्हर्चुअल सहायक.