AI Farming | शेतकऱ्यांनो, आता AI तंत्रज्ञानाचा वापर करा! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

AI Farming | हवामान बदलाचा शेतीला फटका; आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, कृषिमंत्री भरणे यांचे मत
Mangaon Rice Farming
Mangaon Rice FarmingPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत असून, निसर्गचक्र पूर्णपणे बदलले आहे. कुठे अतिवृष्टी होते, तर कुठे पाऊसच पडत नाही. या बदलत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारखे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीचे योग्य नियोजन करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

Mangaon Rice Farming
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्यात 12 कोटी भाविक येणार! अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन आणि कृषी क्षेत्रातील बदलत्या संधींची माहिती शेतकऱ्यांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या १९ व्या आंतरराष्ट्रीय 'कृषीथॉन २०२६' प्रदर्शनाचे गुरुवारी (दि. २६) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार दिलीप बनकर, आ. नितीन पवार, आ. सरोज आहेर, माजी आमदार जयवंत जाधव, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आयोजक संजय न्याहारकर व सहआयोजक साहिल न्याहारकर, सहआयोजक अश्विनी न्याहारकर, सहआयोजक नितीन मराठे, भाऊलाल तांबडे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा गौरव करताना मंत्री भरणे म्हणाले की, नाशिक हा शेतीच्या बाबतीत राज्यातील सर्वात प्रगत जिल्हा आहे. नाशिकमध्ये जे नवनवीन प्रयोग आणि पिके घेतली जातात, त्यांचेच पुढे संपूर्ण राज्यभरात अनुकरण केले जाते. काळानुसार बदलून शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात साहिल न्याहारकर यांनी 'कृषीथॉन' च्या आयोजनामागील भूमिका मांडली.

विविध स्टॉलला भेटी

कृषिमंत्री भरणे यांनी कृषीथॉन २०२६ प्रदर्शनाला भेट देत विविध कंपन्या व संस्थांच्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी यंत्रसामग्री, शेतीसाठी उपयुक्त उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कृषी उत्पादनांची माहिती घेतली.

Mangaon Rice Farming
Farmer Loan Waiver | नाशिक जिल्ह्यातील 21 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; 127 शेतकऱ्यांना मिळाला लाभ

यांचा झाला सन्मान

उद्घाटन सोहळ्यात 'कृषीथॉन विशेष सन्मान २०२६' देऊन गौरविण्यात आले. यात द्राक्ष उत्पादक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे श्रीराम ढोकरे यांना द्राक्ष महर्षी सन्मान, सामाजिक व रचनात्मक कार्यातील मोलाच्या योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ यांना कर्मयोगिनी सन्मान, दुग्धव्यवसाय क्षेत्रातील आदर्शवत कार्यासाठी अतुल डेअरीचे संचालक नागराज देवरे (बापूसाहेब) यांना दुग्धमहर्षी, तर कृषी उद्योग क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे संचालक बापूसाहेब पिंगळे यांना कृषी उद्योगरत्न सन्मान यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.