Moushumi Chatterjee | अभिनेत्री मौसमी चॅटर्जीना ग्राहक आयोगाचा चाप

Moushumi Chatterjee | तब्बल ३ लाख रुपये घेऊनही डॉक्टरांच्या कार्यक्रमाला दांडी : आर्थिक भरपाईचे आदेश
Child Care Leave
(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण मानधन, विमानप्रवास आणि निवासाची सुविधा स्वीकारूनही ऐनवेळी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आर्थिक दंड ठोठावला आहे.

Child Care Leave
Chandrapur News | एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई

चॅटर्जी यांनी तक्रारदार डॉ. अरुणा वानखेडे यांना तीन लाख रुपये ९ टक्के वार्षिक व्याजासह देण्याचे, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी एक लाख रुपये नुकसानभरपाई आणि २५ हजार रुपये न्यायालयीन खर्च अदा करण्याचे आदेश आयोगाने दिले. नाशिक येथील ७४ वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे यांनी त्यांच्या वैद्यकीय बॅचमेट्सच्या ५५ व्या गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२३ ला गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये केले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना निमंत्रित करण्यात आले. यासाठी मध्यस्थ दीपाली चव्हाण यांच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले होते. करारानुसार डॉ. वानखेडे यांनी दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे आगाऊ, तर उर्वरित एक लाख रुपये गोव्यात पोहोचल्यानंतर रोख स्वरूपात दिले. याशिवाय अभिनेत्रीचे विमान तिकीट तसेच गोव्यातील हॉटेल फेअरफिल्ड बाय मॅरियट येथील मुक्कामाचाही खर्च आयोजकांनीच केला होता.

विशेष म्हणजे, १७नोव्हेंबरला गोव्यात दाखल झाल्यानंतर सर्व सुविधा स्वीकारूनही चॅटर्जी यांनी दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित न राहता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयोजकांसह उपस्थित डॉक्टरांची मोठी निराशा झाली. सुनावणीदरम्यान मौसमी चॅटर्जी यांच्या वतीने करारातील काही अटींचे पालन झाले नसल्याचा दावा करण्यात आला. त्यांना बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासचे तिकीट देण्यात आले आणि डॉ. वानखेडे स्वतः विमानतळावर स्वागतासाठी आल्या नव्हत्या, असा युक्तिवाद करण्यात आला.

मात्र, आयोगाने हा दावा फेटाळून लावत तिकीट अथवा इतर अटी मान्य नसत्या तर त्यांनी मुंबईतूनच त प्रवास नाकारायला हवा होता. गोव्यात येऊन विमानप्रवास, हॉटेल आणि मानधनाचा लाभ घेतल्यानंतर कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे हे अयोग्य असल्याचे आयोगाने नमूद केले.

Child Care Leave
Pune Smart Meter: स्मार्ट मीटरवरून गैरसमजाचा धुराळा; ग्राहक संघटनांचा विरोध कायम

डॉ. वानखेडे यांना गुडघ्याच्या दुखापतीमुळे विमानतळावर जाता आले प्र नव्हते. मात्र, त्यांनी इतर डॉक्टरांना पुष्पगुच्छासह स्वागतासाठी पाठविले श होते त्यामुळे स्वागत न झाल्याचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असेही व आयोगाने निरीक्षण नोंदविले.

ग्राहक कायद्यापुढे उत्तरदायी : आयोग

३० जून २०२६ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस. डोळहारकर आणि सदस्यांनी तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना आर्थिक परतावा आणि नुकसानभरपाईचे आदेश दिले. या प्रकरणातील मध्यस्थ दीपाली चव्हाण या समन्वयक असल्याने त्यांच्याविरोधात कोणताही आदेश देण्यात आला नाही. करारानुसार सेवा न देणाऱ्या नामवंत व्यक्तींनाही ग्राहक कायद्यापुढे उत्तरदायी राहावे लागते, असा महत्त्वपूर्ण संदेश या आदेशातून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news