नाशिक : सराफ व्यावसायिकाकडे सापडली 26 कोटींची रोकड
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या आयकर विभागाच्या अधिकार्यांनी कॅनडा कॉर्नर येथील एका बड्या सराफी व्यावसायिकाकडून तब्बल 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तांचे दस्तावेज जप्त केलेे. ज्वेलर्स दुकानांसह वर असलेल्या त्याच्याच डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग तीस तास तपासणी करीत हा ऐवज शोधून काढला आहे.
अशी झाली कारवाई
* सुराणा ज्वेलर्स यांची सराफी पेढी व वरच्याच मजल्यावर असलेल्या महालक्ष्मी रिअल इस्टेटच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला.
* राका कॉलनी येथील त्यांच्या आलिशान बंगल्यातही स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली.
* शहरातील विविध कार्यालये, लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सची तपासणी केली.
* मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तावेज जप्त केले.
* सकाळी 7 पासून कर्मचारी रोकड मोजत होते. तब्बल 14 तास रोकड मोजण्याची प्रक्रिया सुरू होती.
* रोकड सात कारमधून मोजणीसाठी सीबीएसजवळील स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली.
* लपवलेली रोख रक्कम बाहेर काढण्यासाठी बंगल्यातील फर्निचर तोडल्याचेही समोर येत आहे.