नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा ; सुरगाण्याला सर्वाधिक फटका

अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात सोमवारी (दि. १५) वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १०७ गावांमधील ७२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे ३ हजार ५१८ शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाण्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, ५०२ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट पसरली असून, पाऱ्याने चाळिशी पार जाऊन नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे उकाड्याने जनता त्रस्त झाली असतानाच आठवड्याच्या प्रारंभी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक हाेता. त्यामुळे तेथील पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांत ६१२ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे. सुरगाण्यात आंबुपाडा, बेडसे, ठाणगाव, गुरुटेंभी, झगडपाडा, खोकरविहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहुले गावांत आंबाच्या बागांसह काही घरांवरील पत्रे, कौलांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने एकूण ६४९ हेक्टरवरील आंबा पीक बाधित झाले आहे. ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अवकाळीचे नुकसान

तालुका        गावे            शेतकरी

सुरगाणा       68             2773

त्र्यंबकेश्वर     32             637

पेठ             07              108

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news