नाशिक: मनमाडजवळ ट्रक – कारच्या धडकेत ५ जण ठार

file photo
file photo
Published on
Updated on

येवला : पुढारी वृत्तसेवा : नगर – मनमाड राज्य महामार्गावर मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातात मृत झालेले पाचही जण नाशिक येथील गंगापूरचे असल्याचे समजते.

पाच पैकी दोघांची ओळख  पटली असून ललित शरद सोनवणे, गणेश शरद सोनवणे (रा. पेठ रोड) या सख्ख्या भावांसह रोहित धनवटे, श्रेयस धनवटे आणि प्रतीक नाईक अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, या कारने (MH- 06,AN-8890) पाच तरुण मनमाडकडे जात होते. यावेळी अनकवाडेजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कार ट्रकखाली दाबली गेल्यामुळे तिचा चक्काचूर झाला. कार मधील पाचही तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले. त्यानंतर  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

हा अपघात एवढा भीषण होता की, या धडकेमध्ये कारचा चुराडा झाला होता. घटनास्थळी मदतीला पोहोचलेल्या ग्रामस्थांना अक्षरशा कार तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातामुळे राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी येवला तालुका पोलिस तातडीने दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार सर्व मृतदेह मनमाड येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news