Nashik Kumbh Mela 343 crore rupees road infrastructure funding |रस्ते सुविधांसाठी ३४३ कोटींची मान्यता

डुबेरे-सोनारी ते भगूर रस्त्यासह समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी निधी
Rupees
RupeesPudhari
Published on
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी-सोनांबे शिवडे-पांढुर्ली-विंचूरदळवी ते भगूर रस्ता, तसेच बोरखिंड येथे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या इंटरचेंजच्या कामासाठी ३४३ कोटी ९९ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिककडे येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभआणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डुबेरे-सोनारी परिसरातून भगूर तसेच समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी उपलब्ध झाल्याने भाविकांच्या वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास आणि कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित कामामध्ये मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रीट रस्ता यांचा समावेश आहे.

तसेच चार नवीन मोठ्या पुलांचे, चार लहान पुलांचे, पोहोचमार्गाचे, सात वाहतूक भुयारी मार्गांचे, पाच नवीन बॉक्स कल्व्हर्टचे आणि दोन नवीन पाइप कल्व्हर्टचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे कुंभमेळ्यात भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय संरक्षक भिंती, वृक्षलागवड, पेव्हर ब्लॉक, बसथांबा, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, भूसंपादन, सौंदर्गीकरण, आरसीसी व कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्गावरील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व नागरिक सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

Rupees
Nashik Kumbh Mela | कुंभसाठी रस्तेकामांना 'गती'चा डोस

या कामास तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक वन व परवानग्या, पर्यावरणविषयक भूसंपादन, वाहतूक अडथळ्यांबाबतची खातरजमा तसेच पूल व उड्डाणपुलांच्या आखणीस सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर निधीच्या मर्यादितच कामाचा खर्च राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत

Rupees
Gangapur Road Traffic | गंगापूर रोडच्या वाहतूक कोंडीला मिळणार पर्यायी मार्ग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news