'लाडक्या बहिण' योजनेमुळे 30 हजार महिलांना मिळाले हक्काचे खाते; बँकेलाही फायदा

दीड महिन्यात ३० हजार महिलांनी उघडले बचत खाते; खातेधारकांची संख्या वाढली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
बँक खाते नाही त्यादेखील बँकेत बचत खाते उघडण्यासाठी पोस्टात हजेरी लावत आहेत.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी महिलावर्गात उत्साह आहे. त्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते नाही त्यादेखील बँकेत बचत खाते उघडत असून, त्याचा फायदा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेलाही होत आहे. गत दीड महिन्यात जिल्ह्यातील सुमारे ३० हजार महिलांनी पोस्ट बँकेत बचत खाते सुरू केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विस्तारीकरणाच्या उद्देशास शासकीय योजनांमुळे पोस्ट बँकेस पाठबळ मिळत आहे. (Post Bank is getting support due to government schemes for the purpose of expansion in rural areas)

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेस १ सप्टेंबर २०१८ पासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार नाशिक शहरात तेव्हापासून ३ लाख ३५ हजार जणांनी या बँकेत बचत खाते सुरू केले आहे. तर ग्रामीण भागातही सुमारे ३ लाख ५० हजार जणांनी खाते उघडले आहेत. त्यापैकी सुमारे ५० टक्के खाती ही महिलांची असल्याचे प्रशासनाने सांगितले. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून नागरिकांना आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांना बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात बँकांचे जाळे असले तरी नागरिकांचे खाते नसल्याचे चित्र असते. त्यामुळे पोस्ट बँकेने ग्रामीण भागात पोस्टामार्फत बँक खाते सुरू करण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Nashik News | 'भावा'कडून बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच मिळाली मानाची ओवाळणी

संपूर्ण डिजिटल पद्धतीने बँकिंग व्यवहार होत असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होतो. तसेच बचत खात्यात विशिष्ट रकमेपर्यंत पैसे शिल्लक ठेवण्याची मर्यादा नसल्यानेही त्याचा सर्वांना फायदा होतो. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २ मुख्य शाखा असून, ५५ उपकेंद्रे आणि २७६ पोस्ट कार्यालयांमार्फत नागरिकांचे बँक खाते सुरू केले जात आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, टपाल खातेही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

खातेधारकांना कळेल इतक्या सोप्या भाषेत बँकेचे ॲप असून, अशिक्षित खातेधारकांनाही गावातल्या गावात पोस्ट कार्यालयात जाऊन आर्थिक व्यवहार करता येतात. त्यामुळे नागरिकांचा कल वाढत आहे. बँकिंग व्यवहारांसोबतच इतर सुविधा मिळत असल्याने खातेधारकांची संख्या वाढत आहे.

राजीव दुबे, व्यवस्थापक, इंडिया पोस्ट पेमेंन्ट्स बँक, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news