Nashik | 'आई माझ्या शिक्षणासाठी त्रास घेऊ नको '! चिठ्ठी लिहित २० वर्षीय विद्यार्थिनीनं जीवन संपवलं

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे
Nashik
पूजा दीपक डांबरे. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Nashik News

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, 'आई माझ्या शिक्षणाचा त्रास नको घेऊ', अशी भानविक चिठ्ठी लिहित जीवन संपवले आहे. सदर मुलीचे आई पोलिस अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Nashik
Nashik Moneylender : दोन खासगी सावकारांवर कारवाई

पूजा नुकतीच बारावी पास झाली. तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षणही सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. 'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी धावपळ होते,' असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

Nashik
Honey Trap Case | हनी ट्रॅप : विशेष पथक नाशिकमध्ये तळ ठोकून

कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती. आईवर तिचे जीवापाड प्रेम होते. मात्र, आई पोलिस खात्यात कार्यरत असल्याने दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता. या तणावातूनच शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी आठपूर्वी पूजाने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.

हा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news