

नाशिक :भोंदू अशोक खरात वाच्या विरोधातील महिला लैंगिक शोषण प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) महत्त्वाची कारवाई करत पहिल्या दोन गुन्ह्यांत तब्बल १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. उर्वरित दोन गुन्ह्यांचे आरोपपत्रही लवकरच दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडवून दिली आहे. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर धक्कादायक माहिती समोर येत असल्याने प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, विश्वासघात तसेच बनावट खाती उघडल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिला लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी आणि त्यांच्या विशेष पथकाकडून तपासाची सूत्रे हाताळली जात आहेत. एसआयटीने ताब्यात घेतल्यानंतर अशोक खरात याची अनेक दिवस कसून चौकशी करण्यात आली होती.
तपासादरम्यान पीडित महिलांचे जबाब, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, मोबाइल डेटा, बैंक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यात आले आहेत. काही पीडित महिलांनी दिलेल्या जबाबांमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपपत्रात अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक अहवाल आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील समाविष्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या अशोक खरात हा सित्रर पोलिस ठाण्यातील आर्थिक फसवणूक आणि बनावट खाती उघडल्याच्या गुन्ह्यांत पोलिस कोठडीत आहे. तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे. उर्वरित पुढील काही धकादायक दिवसांत खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे
नामकर्ण आवारेला चार दिवस पोलिस कोठडी
नाशिक: भोंदू अशोक खरातचा सहकारी उद्योजक नामकर्ण आवारे वाला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नामकर्ण आवारेला १३ मे रोजी सिन्नर पोलिसांनी अटक केली होती. सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले की खरात व नामकर्ण आवारे पूर्वीपासून एकमेकांचे परिचित व ओळखीचे असून, श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुंदेवाडी (ता. सित्रर) या पतसंस्थेत अशोक एकनाथ खरात यास चेअरमनपद दिले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे असलेल्या शिवनिका ट्रस्टवर चिटणीसपदी बसवण्यामागे काय उद्देश होता, याबाबत आरोपीची अधिक चौकशी करणे गरजेचे आहे.
या गुन्ह्याचा तपास व्यापक व विस्तृत स्वरूपाचा असून, नमूद मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी काही उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर गुन्ह्याचा तपास करणे आवश्यक आहे. यासाठी नामकर्ण यशवंत आवारे वास सात दिवस पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
श्री जगदंबा बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या बनावट ३२ खात्यांत खरात बरोबर त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नामकर्ण आवारे यास अटक करण्यात आली आहे, नामकर्ण आवारे हा भोंदू खरातच्या शिवलिका या संस्थेच्या विश्वस्तपदी, द्धा आहे. भोंदू खरातला १८ मार्चला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नामकर्ण आवारेच्या चौकशीची चर्चा सुरू होती. आता त्यास थेट अटक झाल्यामुळे खरातच्या कृत्यांमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.